Monday, March 30, 2026

Pune–Nashik Highway Mega Project : पुणे-नाशिक महामार्गाच्या कामाला वेग; ट्रॅफिक विसरा आता प्रवास होणार वेगवान

Pune–Nashik Highway Mega Project : पुणे-नाशिक महामार्गाच्या कामाला वेग; ट्रॅफिक विसरा आता प्रवास होणार वेगवान

पुणे : सततच्या ट्रॅफिकमुळे त्रस्त असलेल्या पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे ते नाशिक या मार्गावरील महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पाला गती मिळाली असून, यामुळे प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे.

८ पदरी उन्नत मार्गासह १४ लेनचा महामार्ग

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण मार्फत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात आहे. सिंगल पिलर तंत्रज्ञानाचा वापर करून उन्नत ८ पदरी मार्ग उभारण्यात येणार आहे. त्यासोबतच सध्याचा ४ पदरी रस्ता ६ पदरी करण्यात येणार आहे. परिणामी, हा संपूर्ण मार्ग तब्बल १४ पदरी होणार असून वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

स्थानिक व जड वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग

या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक वाहतूक आणि अवजड वाहनांसाठी स्वतंत्र लेनची व्यवस्था केली जाणार आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, तसेच प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत होईल.

औद्योगिक क्षेत्रांना मोठा फायदा

भोसरी, चाकण, मोशी आणि खेड या प्रमुख औद्योगिक भागांना या महामार्गामुळे वेगवान कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. विशेषतः चाकण एमआयडीसीमध्ये ये-जा करणाऱ्या हजारो कामगार आणि उद्योजकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबवला जात असून, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या भागाच्या विकासाला यामुळे चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या मेगा प्रकल्पामुळे पुणे-नाशिक प्रवासाचा वेळ कमी होणार असून, वाहतुकीचा ताण कमी करत आर्थिक आणि औद्योगिक वाढीसही गती मिळणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा