Monday, March 30, 2026

विरोधी पक्षनेत्यांचा पुन्हा एकदा कांगावा

विरोधी पक्षनेत्यांचा पुन्हा एकदा कांगावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांना सध्या कोणत्याही मुद्दयावर आपली भूमिका मांडता येत नसल्यामुळे तसेच महत्वाच्या विषयांना हात घालता येत नसल्याने पुन्हा एकदा महापौरांकडून अपमान झाल्याचा कांगावा करण्याचे नाटक करत प्रसिध्दीझोतात राहण्याचा प्रयत्न केला. महापौर दालनातून आपल्याला बाहेर जा असे सांगण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सभागृहात हरकतीच्या मुद्दयाद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतला. परंतु पेडणेकर आणि अब्राहनी या दोन्ही नेत्यांना आपण अँटीचेंबरमध्ये सन्मानपूर्वक बसवल्यानंतरही त्या तिथून उठून जात अशाप्रकारचे चित्र निर्माण करत असल्याचे स्पष्टीकरण महापौर रितू तावडे यांनी दिले. दरम्यान, या मुद्दयावरून विरोधी पक्षांनी सभात्याग करत याचा निषेध केला असला तरी त्यांचा हरकतीचा मुद्दाच सभागृहात उठवून लावण्यात आला आहे.

मुंबई महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे महापौरांच्या दालनात आपला अपमान झाल्याचे सांगितले. महापौरांच्या दालनात सर्व गटनेते आणि अध्यक्षांना बैठकीसाठी बोलावले होते. त्यानुसार मी आणि अन्य पक्षाचे गटनेते त्यांच्या दालनात पाहोचलो. पण आम्ही तिथे पोहोचल्यानंतर शिवसेनेचे गटनेते अमेय घोले हे आपल्या सर्व नगरसेवकांसमवेत तिथे पोहोचले आणि त्यांनी आम्हाला काही महत्वाचे बोलायचे आहे असे सांगितले. त्यावेळी तिथे भाजपचेही सदस्य होते. त्यानंतर आम्हाला बाहेर जा असे सांगण्यात आले. त्यानंतर महापौरांनी आम्हाला अँटीचेंबरमध्ये बसायला सांगितले. हा बकायदा इन्सल्ट आहे. हा अपमान पुन्हा करू नये, पुन्हा हे सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

यावर शिवसेना गटनेते अमेय घोले यांनी आमच्या प्रभागातील नगरसेवकांच्या महत्वाच्या विषयावर चर्चा करायची असल्याने आत आपण तिथे बसावे असे सांगितले. पण बाहेर जा असे सांगितले नाही. त्यामुळे नक्कीच कुणाचा अपमान करण्याचा प्रयत्न नव्हता किवा केलाही नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला. तर शैलेश फणसे यांनी विरोधी पक्षनेता पद हे वैधानिक असून जर त्यांचा अपमान झाला असल्याने ही सभा झटपट सभा तहकूब करावी अशी मागणी उपसूचना केली. याला काँग्रेसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर प्रत्यक्ष सभेत चर्चेत भाग न घेता विरोधी पक्षाने याचा निषेध करत सभात्याग केला.

मात्र, त्यानंतर बोलतांना महापौर रितू तावडे यांनी सभागृहात एखादा मुद्दा उपस्थित केल्यांनतर तो ऐकण्यासाठीही उपस्थित राहणे आवश्यक असते. पण विरोधकांना केवळ कांगावा करण्याची सवय आहे. त्यांना ऐकून घेण्याची सवय नाही. शीव रुग्णालयाच्या भूमीपुजन प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात राजशिष्टार पाळला गेला नसल्यामुळे अमेय घोले शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांसमवेत तिथे आले आणि आम्हाला काही महत्वाच्या विषयावर बोलायचे आहे असे सांगितले. त्यावेळी तिथे विरोधी पक्षनेत्या आणि समाजवादी पक्षाच्या गटनेत्या होत्या. त्यांना अँटीचेंबरमध्ये बसण्याची सूचना केली. त्यानुसार त्या तिथे बसल्याही. परंतु काही मिनिटांनी अँटीचेंबरमधून बाहेर आल्या आणि तुमचे झाले की मी येते असे सांगत महापौर दालनाच्या बाहेर निघून गेल्या. त्यामुळे त्या केवळ विरोधी करून निघून गेले. त्यामुळे या हरकतीच्या मुद्दयात काही तथ्य नसल्याचे सांगत त्यांचा मुद्दा उडवून लावला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा