IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला आणखी एक धक्का; धोनीनंतर ब्रेविसही दुखापतग्रस्त

मुंबई : आयपीएल २०२६ मोहीम सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) अडचणी वाढत आहेत. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) दुखापतीमुळे दोन आठवड्यांसाठी संघाबाहेर गेल्यानंतर, आता त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. स्फोटक फलंदाज डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brewis) देखील दुखापतग्रस्त झाला आहे. तो दोन ते तीन सामन्यांसाठी संघाबाहेर राहू शकतो. चेन्नई या हंगामातील आपला पहिला सामना ३० मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेणार आहे.


चेन्नईने यापूर्वीच ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज नॅथन एलिसला गमावले आहे, जो दुखापतीमुळे संपूर्ण हंगामासाठी संघाबाहेर गेला आहे. ब्रेविस हा दुखापतग्रस्त होणारा तिसरा क्रिकेटपटू आहे. त्याला बरगडीला ताण आल्याची माहिती आहे. तो मधल्या फळीत खेळतो आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. चेन्नईने त्याला आयपीएल २०२५ दरम्यान दुखापतीमुळे बदली क्रिकेटपटू म्हणून करारबद्ध केले होते. गेल्या हंगामातील संघाच्या खराब कामगिरीनंतर आणि त्याच्या फलंदाजीच्या शैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर ब्रेविसला संघात घेण्यात आले होते. हा निर्णय प्रभावी ठरला.


सीएसकेने वेगवान गोलंदाज गुर्जपनीत सिंगच्या जागी ब्रेविसला २.२० कोटी रुपयांना संघात घेतले. त्याने सहा सामन्यांमध्ये १८० च्या स्ट्राईक रेटने आणि ३७.५० च्या सरासरीने २२५ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा आणि १७ षटकारांचा समावेश आहे. ब्रेविस यापूर्वी २०२२ ते २०२४ या काळात मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला होता आणि त्याने संघासाठी १० सामने खेळले होते.


ब्रेविसच्या (Dewald Brewis) अनुपस्थितीमुळे सीएसकेला मॅथ्यू शॉर्टला मधल्या फळीत खेळवावे लागू शकते. दुखापतीतून सावरल्यानंतर हा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू क्रिकेटपटू संघात परतला आहे. तो वरच्या फळीत फलंदाजी करतो, पण सीएसकेकडे त्याच्यासाठी मधल्या फळीत जागा आहे. तो ऑफ-स्पिन गोलंदाजीही करू शकतो. सरफराज खान, कार्तिक शर्मा, उर्विल पटेल आणि अमन खान हे देखील पर्याय आहेत.

Comments
Add Comment

Sunil Gavaskar : आयपीएलमधून ऐनवेळी माघार घेणाऱ्या क्रिकेटपटूंवर कठोर कारवाईची गावस्करांची मागणी

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही एक अशी लीग आहे, ज्यात खेळण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. पण

KKRvsMI : कोलकाता नाईट रायडर्सला हरवत मुंबई इंडियन्सने वानखेडेवर मिळवला ऐतिहासिक विजय

मुंबई : मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धचा सामना सहा विकेट राखून जिंकला. तब्बल १३ वर्षांनंतर मुंबई

आयपीएलमधून ऐनवेळी माघार घेणाऱ्या क्रिकेटपटूंवर कठोर कारवाईची गावस्करांची मागणी

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही एक अशी लीग आहे, ज्यात खेळण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. पण

R. Ashwin : आर. अश्विन आता अमेरिकेत खेळणार क्रिकेट : सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्ससोबत करार

नवी दिल्ली : भारताचा माजी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन आता अमेरिकेच्या टी-२० लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याने

IPL 2026 : पहिला सामना हरण्याची मुंबई इंडियन्स परंपरा राखणार?

मुंबई : आयपीएल २०२६ (IPL 2026) मधील दुसरा सामना मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध कोलकता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात मुंबईच्या

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हैदराबादवर विक्रमी विजय

बंगळुरू : गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपणच चॅम्पियन असल्याच्या थाटात खेळ केला. इंडियन प्रीमिअर लीग २०२६