नवी दिल्ली : राजधानी दिल्लीला हादरवून सोडण्याचा दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अत्यंत चातुर्याने उधळून लावला आहे. लष्कर-ए-तोयबा (LeT) या प्रतिबंधित संघटनेचा अत्यंत प्रभावशाली हँडलर शब्बीर अहमद लोन याला अटक करण्यात आली असून, यामुळे एक भीषण अनर्थ टळला आहे. शब्बीर अहमद हा साधा दहशतवादी नसून, तो बांगलादेशातून भारतातील दहशतवादी हालचालींचे नियंत्रण करत होता. या अटकेमुळे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI कशा प्रकारे भारतीय सीमांच्या बाहेरून कट रचत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. लोनच्या अटकेमुळे लष्कर-ए-तोयबाच्या स्लीपर सेल्सना मोठा धक्का बसला असून, आगामी काळातील अनेक धोके टळले आहेत.
मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ...
लाल किल्ला आणि मेट्रोवर हल्ल्याचा कट उधळला
दिल्ली पोलिसांच्या तपासात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. अटक करण्यात आलेला दहशतवादी शब्बीर अहमद लोन याच्या निशाण्यावर दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला आणि अत्यंत गर्दीची मेट्रो स्थानके होती. राजधानीत मोठी जीवितहानी आणि दहशत निर्माण करण्याचा त्याचा क्रूर मनसुबा पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. काही दिवसांपूर्वी मेट्रो परिसरात दहशतवादी पोस्टर्स लावून खळबळ माजवणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार शब्बीरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. शब्बीर हा भारतात नसून बांगलादेशात बसून 'एनक्रिप्टेड ॲप्स'च्या माध्यमातून आपल्या हस्तकांना सूचना देत असे, जेणेकरून सुरक्षा यंत्रणांना त्याचा सुगावा लागू नये. गर्दीच्या ठिकाणांची रेकी (टेहळणी) करून तिथे भीषण साखळी स्फोट घडवून आणण्याची त्याची तयारी अंतिम टप्प्यात होती.
Shabir Ahmed Lone, LeT terrorist, handler of the recently busted LeT module in Metro Poster Case, has been arrested by a team of Special Cell/NDR: Delhi Police
— ANI (@ANI) March 30, 2026
बनावट कागदपत्रे आणि घुसखोरांचा वापर
सामोर आलेल्या माहितीनुसार शब्बीर अहमद लोणचे कार्यक्षेत्र हे बांग्लादेशातचं होते. त्या ठिकाणाहून तो बेकायदेशीरपणाने भारतामध्ये घुसून आलेल्या बांगलादेशी नागरिकांना शोधत असे. या सर्व नागरिकांचं तो ब्रेनवॉशिंग करून त्यांना जिहादच्या नावाखाली भारतामध्ये दहशदवादी कृत्य करण्यासाठी त्यांना केले जात होते. धक्कादायक खुलासा म्हणजे, या सर्व घुसखोरांना भारतामध्ये राहण्यासाठी बनावट आधारकार्ड, आणि इतर सरकारी कागदपत्रे मिळवून देण्यामध्ये शब्बीरचा मोठा कट होता. फेब्रुवारी २०२६ मध्ये पोलिसांनी पकडलेल्या ८ जणांपैकी ७ जण हे बंगदेशीचं नागरिक होते, ज्यांना शब्बीरनेच भारतात पूर्ण पाने सेट केलं होतं.
मुझफ्फराबादचे ट्रेनिंग आणि हाफिज सईदचा हस्तक
दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी शब्बीर अहमद लोन हा केवळ एक मोहरा नसून, तो या संघटनेचा जुना आणि प्रगत प्रशिक्षण घेतलेला अत्यंत धोकादायक सदस्य असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्या अटकेमुळे लष्करच्या जुन्या नेटवर्कचा पर्दाफाश झाला आहे. शब्बीरने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद येथील लष्कर-ए-तोयबाच्या तळावर अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे आणि लष्करी डावपेचांचे प्रगत प्रशिक्षण घेतले होते. तो केवळ स्थानिक हस्तक नसून, जागतिक दहशतवादी हाफिज सईद आणि झकी-उर-रहमान लखवी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली काम करत होता. तब्बल १९ वर्षांपूर्वी, म्हणजेच २००७ मध्येही दिल्ली पोलिसांनी त्याला एके-४७ आणि ग्रेनेड्ससह अटक केली होती. मात्र, जामिनाचा फायदा घेऊन तो बांगलादेशला पळून गेला. सीमेपलीकडे राहून त्याने पुन्हा आपले नेटवर्क सक्रिय केले आणि दिल्लीला पुन्हा एकदा लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
स्पेशल सेलची गुप्त मोहीम यशस्वी
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अत्यंत गोपनीयता पाळून राबवलेल्या एका धाडसी मोहिमेमुळे लष्कर-ए-तोयबाचे भारतातील एक मोठे जाळे मुळासकट उपटून टाकण्यात यश आले आहे. अनेक महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर आणि तांत्रिक पाळत ठेवल्यानंतर, दहशतवादी शब्बीर अहमद लोन याला बेड्या ठोकून पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने मोठी कामगिरी केली आहे. हे ऑपरेशन केवळ एका दिवसाचे नसून, स्पेशल सेलच्या पथकाने अनेक महिने शब्बीरच्या हालचालींवर आणि डिजिटल पावलांवर बारीक लक्ष ठेवले होते. या अटकेमुळे लष्कर-ए-तोयबाच्या भारतात तयार केलेला एक सक्रिय 'स्लीपर सेल' मॉड्यूल पूर्णपणे कोलमडले आहे. या नेटवर्कचा पर्दाफाश झाल्यामुळे भविष्यात होणारे संभाव्य भीषण दहशतवादी हल्ले रोखण्यात यंत्रणांना यश आले आहे.






