Monday, March 30, 2026

Bigg Boss Marathi 6 : टिकीट टू फिनालेसाठी 'या' सदस्यांमध्ये हाणामारी, बिग बॉसही संतापले

Bigg Boss Marathi 6 : टिकीट टू फिनालेसाठी 'या' सदस्यांमध्ये  हाणामारी, बिग बॉसही संतापले

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सिझन वादग्रस्त ठरल्यामुळे सर्वत्र या सिझनची जोरदार चर्चा रंगली. या बिग बॉस मराठीमधील भांडणं, टास्क, हेवेदावे आणि चढाओढ यामुळे बीग बॉस मराठी ६ सीझन चांगलाच गाजला पण त्याहीपेक्षा जास्त बाहेर आल्यानंतर बिग बॉस स्पर्धकांनी केलेल्या दाव्यावरून मोठी खळबळ उडाली होती.

बिग बॉस मराठी ६ सीझनचे आता काही दिवसच बाकी राहिले असून बिग बॉस आता अंतिम टप्प्यात आलं आहे. आशातच फिनाले जवळ आलं असताना स्पर्धकांमध्ये टिकिट टू फिनालेसाठी चुरस वाढली आहे. नुकताच पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये घरात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळणार आहे. या टास्कमुळे बिग बॉसच्या घरातील २ स्पर्धकांमधला वाद इतका वाढतो की तो हाणामारीपर्यंत पोहचतो. या दोघांवर बिग बॉसही संतापले.

बिग बॉसने घरातील सदस्यांना या आठवड्यात एक वेगळा टास्क दिला. त्यानुसार स्पर्धकांना एखाद्या सदस्याचा टीव्ही फोडायचा होता. ज्या सदस्याचा टीव्ही फुटेल त्या सदस्याचं फिनालेमध्ये जाण्याचं स्वप्न तुटणार आहे.

हा टास्क करताना राकेशनं विशालला नॉमिनेट करत त्याचा टीव्ही फोडला. त्यावेळी राकेश म्हणाला, "माझं नावं आहे विशाल. पर्सनल लाइफबद्दल बोलणं मला चुकीचं वाटलं" राकेशच्या निर्णयानंतर विशाल चांगलाच संतापला. तो म्हणाला, "तू माझ्या एजबद्दल बोलतोस ते पर्सनल नाहीये का? डिवोर्स का झाला?" या वक्तव्यामुळे दोघांमधला वाद अधिकच वाढला. यानंतर राकेश बाहेर येत विशालसोबत जोरदार भांडण करतो. डिवोर्स का काढतोस ? असा सवाल करत तो विशालवर संतापतो. त्यावर विशालही मागे न हटता म्हणतो "तू का काढतोस?" या दोघांमधील वाद इतका वाढतो की ते एकमेकांच्या अंगावर धावून जातात. काही क्षणातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हं दिसू लागतात. दोघांमधील वाढता वाद पाहून घरातील इतर सदस्य लगेच मध्ये पडतात आणि त्या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. सर्वजण मिळून त्यांचं भांडण सोडवतात. यावेळी बिग बॉसच्या घरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं असतं.

दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून बिग बॉस तात्काळ हस्तक्षेप करतात. ते कडक शब्दांत आदेश देतात. "राकेश आणि विशाल, लांब व्हा." या आदेशानंतर दोघांनाही वेगळं करण्यात येतं बिग बॉसच्या घरात आता पुढे काय घडणार हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >