मुंबई : आपल्या 'बरगद' या गाण्यामुळे २०२५ मध्ये रातोरात प्रसिद्ध झालेला गायक अर्पित बाला याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत असून नुकताच पार पडलेल्या एका लाइव्ह कॉन्सर्टमुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. २८ मार्च २०२६ रोजी किंग्डम क्लब अँड किचनमध्ये ज्यावेळी प्रेक्षकांमधील एका व्यक्तीनं अर्पितच्या दिशेनं स्टेजवर बाटली फेकली. त्यानंतर कॉन्सर्टमध्ये गोंधळ निर्माण झाला. रागाच्या भरात स्टेजवर उभ्या असलेल्या गायक अर्पितनं नंतर जे काही केलं त्याबद्दल त्याच्यावर जोरदार टीका होत आहेत.
नेमकं काय घडलं ?
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओत अर्पित परफॉर्मन्स थांबवून प्रेक्षकांशी वाद घालताना दिसत आहे. बाटली कोणी फेकली असं अर्पित संतापून विचारतो आणि त्या व्यक्तीची ओळख पटल्यानंतर त्याचा राग अनावर झाला आणि तो थेट त्याच्यावर थुंकला. एवढच नाही तर त्यानं भडकून पुन्हा ती बाटली चक्क त्या व्यक्तीकडे फेकली. या घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी प्रेक्षकांमधील संबधित व्यक्तीला तेथून बाहेर काढले. यावेळी हे सर्व घडत असताना प्रेक्षकांमधील काहीजण टाळ्या वाजवाताना दिसून आले. त्यानंतर पुन्हा परफॉर्मन्स सुरु करण्याआधी अर्पितनं प्रेक्षकांना परत असं न करण्याच्या इशारा देतो आणि स्पष्ट करतो की अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. "इथे बघा.. काय झालं? भीती निर्माण झाली...हे तुझ्या बहिणीच्या लग्नात हुंड्यात दे" असं त्यानं त्या व्यक्तीला सुनावलं
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून काहींजण अर्पितच्या या वागण्यावर टीका करत आहेत तर काहींजण त्याची बाजू घेत आहेत. प्रेक्षकाने आधी बाटली फेकून त्याला डिवचल्यानं त्याच्या राग अनावर झाला. असं म्हणत चाहते त्याची बाजू घेत आहेत.
View this post on Instagram
अर्पित बाला हा भारतीय स्वतंत्र कलाकार असून तो रॅपर आणि कंटेट क्रिएटर आहे. देशी हिप-हॉप गाण्यांसह डिजिटल कॉमेडी जोडण्यासाठी तो ओळखला जातो. त्याचबरोबर फूसी गँग ग्रूपचा सहसंस्थापक म्हणून तो युट्यूबवरील मजेशीर स्केचमुळं प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर 'महारानी'सारख्या गाण्यांबरोबर त्यानं संगीतकार म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.






