 |
मनाप्रमाणे कार्यभाग साधणार आहात
मेष : शिक्षण, संस्था, नोकरी-व्यवसाय, यात अनुकूल काळ आहे.ज्या व्यक्तीचा खूप मोठ्या कालावधीमध्ये अपेक्षित ठिकाणी बदली झाली नसेल तर आता होण्याची शक्यता आहे .नवीन कलाकारांना संधी प्राप्त होणार आहे चांगल्या कलाकारांचे सिने मे बॉक्स ऑफिस वर यशस्वी होणार आहेत. स्टॉक मार्केट मध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू नये अन्यथा मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये छोट्या मोठ्या प्रमाणात झालेली चहाच्या पेल्यातील वादळे आता संपणार आहेत. अपेक्षित व्यक्तींकडून सहकार्य मिळणार आहे. आपल्या मनाप्रमाणे कार्यभाग साधणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंद निर्माण होणार आहे. जोडीदार आपल्याला समजून घेणार आहे.
|
 |
जीवन सुखमय होणार आहे
वृषभ : शुभ ग्रहांची मोठ्याप्रमाणावर साथ लाभणार आहे त्यामुळे भौतिक जीवन सुखमय होणार आहे पैशाची आवक वाढल्यामुळे खरेदी होईल घरातील वातावरण आनंदी राहणार आहे. अशुभ ग्रहांच्या गोचर भ्रमणामुळे कमी वेळात जास्त पैसा मिळविण्याची इच्छा होऊ शकते. शॉर्टकटने पैसे कमवू नका. त्याचे परिणाम निश्चितच वाईट होतील.सट्टा किंवा लॉटरी मध्ये पैसे लावल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात कुठल्याही प्रकारची वादळे येऊ देऊ नका. विद्यार्थ्यांना पण मनोरंजन करावेसे वाटेल.जुन्या मित्र-मैत्रिणींशी गाठीभेटी होतील त्यामुळे आनंद द्विगुणित होईल. महिलांना खरेदीचा आनंद लुटता येईल. आनंदाचे वातावरण असणार आहे.
|
 |
कामावर लक्ष केंद्रित करावे
मिथुन : नोकरी व्यवसायात खूप ताण निर्माण होणार आहे. जास्त काम आणि कमी पैसे, आउटपुट ही कमी मिळणार आहे.उत्पन्नापेक्षा खर्च वाढणार असल्यामुळे बचतीचे बजेट गडबड होऊन जाणार आहे.व्यापार-व्यवसायात दुकानाचे किंवा शोरूमचे रेंट अचानक वाढल्यामुळे अधिक भार पडल्यामुळे ,आर्थिक दृष्ट्या ताण तणाव निर्माण होणार आहे.या कालावधी मध्ये तुम्हाला स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल, तरच तुमचे ध्येय पूर्ण होईल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तसेच तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा.भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. व्यवहार लक्षात ठेवूनच निर्णय घ्या. कौटुंबिक बाबतीत अनुकूल काळ.
|
 |
महत्वपूर्ण बदल
कर्क : आपल्या नोकरी आणि व्यवसायात किंवा करिअरमध्ये महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतो. आपले प्रत्येक निर्णय आपल्या बुद्धिचातुर्याने आणि विवेकाने घ्यावे, तरच आपल्या जबाबदार्या तुम्ही पूर्ण करू शकाल. बेरोजगार व्यक्तींना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळण्याची संभावना आहे. काही व्यक्तींना मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक करायची असल्यास थोडा काळ वाट बघा. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल, विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करण्यासाठी मेडिटेशन चा आधार घ्यावा. त्यामुळे आपल्याला चांगले मार्क्स मिळण्याची शक्यता आहे. कुठल्या एखाद्या गोष्टींमध्ये चांगली कलाकारी दाखवाल. जे विद्यार्थी मेडिकल ला आहे त्यांना विशेष यश मिळणार आहे.
|
 |
जनसंपर्कात वाढ
सिंह : आपल्या राशीमध्ये शुभ ग्रहांचे भ्रमण चांगल्या प्रकारे होणार आहे. यामुळे व्यापार व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगले बदल होतील. व्यापार व्यवसाय वाढवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. भागीदारीमध्ये किंवा नोकरी व व्यवसायात आपला जनसंपर्क खूप वाढणार आहे. मात्र सर्व दृष्टिकोनातून आपल्याला लक्ष देऊन काम करावे लागेल. घाईगडबडीने नुकसान होऊ शकते, इम्पोर्ट एक्सपोर्ट च्या व्यवसाय मध्ये फायदा होऊ शकतो. कमिशन त्यासारख्या व्यवसायात पण आर्थिक लाभ होतील. प्रेमसंबंधात नवीन आशा उत्पन्न होतील. प्रेमिकांना सफलता. भागीदारी व्यवसायात आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात मिळतील भागीदाराची सलोख्याचे संबंध राहतील.
|
 |
स्थिरता येईल
कन्या : आपणास निश्चितच स्थिरता मिळणार आहे. चहूकडून आपल्याला चांगल्या बातम्या समजतील त्यामुळे मनामध्ये उत्साह व आनंद असेल. ज्या लोकांना परदेशगमनाची अपेक्षा आहे त्यांना परदेशगमन निश्चित होईल. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी ज्या परीक्षा दिली आहेत त्याचे रिझल्ट चांगले येतील. कोर्टकचेरीची काही कामे चालली असल्यास ते निकाल आपल्या बाजूने लागतील.शेजारी किंवा जोडीदार यांच्याकडून या तक्रारी निर्माण होतील मनस्ताप होऊ शकतो सबुरीने निर्णय घ्या .वाद-विवाद वाढवू नका अपशब्द वापरू नका.
|
 |
सकारात्मक बदल
तूळ : आपल्या मित्रांच्या मदतीने थांबलेला पैसा पुन्हा तुम्हाला प्राप्त होईल. ज्या व्यक्ती बेरोजगार आहेतत्यांना चांगल्या नोकरी चालून येतील. आर्थिक बाबतीमध्ये चांगले आणि सकारात्मक बदल होणार आहेत कौटुंबिक जीवनात नाती मजबूत होतील. पण सासू सुने मध्येवाद जास्त वाढू देऊ नका.विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात पुढे जात असतील पण इंजिनिअर किंवा टेक्निकल साईड मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना मात्र जास्त कष्ट करावे लागणार आहेत कॉन्सन्ट्रेशन कडे लक्ष देणे.आपण भाग्या पेक्षा कर्म करण्याला महत्त्व दिले तर यश आपलेच आहे.ज्यांना लग्न करण्याची इच्छा आहे त्यांना योग्य जीवनसाथी मिळेल.
|
 |
पूर्ण विचारांती निर्णय घ्या
वृश्चिक : स्थान परिवर्तन होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये बदल होतील. धार्मिक क्षेत्रात किंवा अध्यात्मामध्ये आपली आवड निर्माण होईल.या कालावधीमध्ये आपल्याकडे ज्या काम करणाऱ्या व्यक्ती होत्या, त्या सोडून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला नवीन कामगारांची भरती करावी लागेल .आपल्या व्यवसायामध्ये अचानक आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी शांततापूर्वक मार्ग काढावा लागेल ,पूर्ण विचारांती निर्णय घ्या .नोकरी व्यवसायामध्ये पुरुषांनी स्त्रियां पासून लांबच राहावे. घरामध्ये जे गढूळ लेले वातावरण असेल,त्यामध्ये बहिणीची मध्यस्ती योग्य राहील.
|
 |
नवीन संधी प्राप्त होतील
धनु : प्रॉपर्टी डीलर, बिल्डिंग मटेरियल सप्लायर, यांच्याशी संबंधित असलेले व्यवसाय यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आपल्या करिअर साठी हा खूपच चांगला योग आहे. जे जातक नोकरीच्या शोधात होते त्यांना उत्तम नोकरी मिळेल. ज्यांना सरकारी नोकरीत बदली हवी आहे त्यांना बदली मिळेल, बदली इच्छित ठिकाणी होईल .नोकरी व्यवसाया संबंधी लांबचे प्रवास होवु शकतात चांगली गोष्ट आहे की या प्रवासाचे परिणाम चांगले मिळतील.नवीन संधी प्राप्त होतील. मोठ्या ठिकाणी मोठ्या जागेवर काम करावयास मिळेल.
|
 |
आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे
मकर : या सप्ताहात काही अशुभ योगामुळे आपल्या. आर्थिक स्थिती मध्ये चढ-उतार होण्याची शक्यता आहे .काही अंशी आर्थिक स्थिती चिंताजनक असू शकते. पण लवकरच आपली आर्थिक स्थिती चांगली होईल. घरामध्ये कुटुंबा मध्ये सुरुवातीपासून चाललेले वाद-विवाद कमी होतील. घरामध्ये आनंदाचे व खेळीमेळीचे वातावरण निर्माण करणे जरुरी आहे. प्रेम प्रकरणना साठी हा कालावधी चांगला आहे. जर आपल्याला कोणाला प्रपोज करायचा असल्यास तुम्ही या कालावधीमध्ये करू शकता. यासाठी हा कालावधी आपणास अनुकूल आहे. आपण आपल्या प्रिय जनान बरोबर सहलीला जाऊ शकता. हा कालावधी अतिशय आनंददायी व आठवणीत राहण्यासारखा असणार आहे. जर कुठल्या नातेसंबंध वाढवायचे असतील तर हाच कालावधी पण आपल्याला या साठी चांगला आहे. मात्र कुठल्याही परिस्थितीत आपण आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे, गोड बोलूनच आपल्याला काम करून घ्यावे लागणार आहे.
|
 |
चांगले लाभ होणार आहेत
कुंभ : आपल्या जन्मगावी किंवा जन्म गावापासून दूर दोन्ही ठिकाणी कुठेही असाल तेथे आपणास चांगले लाभ होणार आहेत. मागे काही योजना आपण बनवल्या होत्या त्यावेळी त्याचा फायदा झाला नाही, पण आता त्याचे नियोजन करून त्याचे आयोजन करा. त्यात नक्की फायदा होईल. या योजना कार्यान्वित होतील.आपले कार्यक्षेत्र विस्तार करण्याची चांगली संधी आहे .नवीन नोकरीची संधी मिळेल.आपल्याला नवीन बिजनेस सुरु करायचा असेल तरी हा कालावधी आपणास उत्तम आहे. सप्ताहाच्या मध्यावधी मध्ये एखादा सन्मान आपणास प्राप्त होऊ शकतो. इम्पोर्ट एक्सपोर्ट च्या व्यवसायामध्ये सुद्धा आपणास यश येईल. त्यामध्ये परदेशातून आपणास चांगले फायदे मिळू शकतात. तसेच नोकरी करणाऱ्यांना बढतीचे योग आहे. या कालावधीमध्ये आपले परदेशाशी संबंध वाढवू शकतात. त्याचा उपयोग आपल्याला कालांतराने जास्त चांगल्याप्रकारे होऊ शकतो.
|
 |
भावनांवर संयम राखणे आवश्यक आहे
मीन : आपण आपल्या जोडीदाराबरोबर वेळ घालवताना आपल्याला पुष्कळ ऊर्जा व चैतन्य जाणवेल.प्रेमिकांना मात्र आपल्या भावनांवर संयम राखणे आवश्यक आहे अन्यथा दोघांमध्ये गैरसमज होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे मतभेद होऊ शकतात.व्यापार व्यवसाय नोकरी करणाऱ्यांना हा कालावधी अतिशय उत्तम आहे. कलाकारांना नवीन संधी मिळतील लेखक आणि कविता करणाऱ्यांना उत्तम कालावधी आहे.आपले प्रत्येक कार्य सहजतेने पूर्ण होईल पूर्वी राहिलेले पेंडिंग कामे पूर्ण करण्यासाठी, आपल्याला वरिष्ठांचा पण सहयोग मिळू शकतो.विद्यार्थ्यांना पालक व शिक्षक यांचे पूर्ण मार्गदर्शन लाभेल त्याचे फायदे विद्यार्थ्यांना होणार आहे, विद्यार्थी आपल्या क्षेत्रात यश मिळवतील.
|