Sunday, March 29, 2026

Tuljabhavani Temple : चैत्र पौर्णिमा महोत्सवानिमित्त २२ तास खुलं राहणार तुळजाभवानीचं दर्शन

Tuljabhavani Temple : चैत्र पौर्णिमा महोत्सवानिमित्त २२ तास खुलं राहणार तुळजाभवानीचं दर्शन

तुळजापूर : तुळजाभवानी देवीच्या मंदिरात यंदा विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली असून चैत्र पौर्णिमा महोत्सवानिमित्त तुळजापूर येथील भाविकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महोत्सव काळात मंदिर २२ तास खुलं ठेवण्यात येणार आहे. तसेच भाविकांना सुरळीत व सुलभ दर्शन मिळावं याकरीता उद्यापासून मंदिरात प्रवेशासाठी भक्तांना बीडकर पायऱ्या मार्गाचा वापर करता येणार आहे.

श्री तुळजाभवानी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमा महोत्सव ३० मार्च २०२६ ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी यावेळी देशभरातून लाखो भाविक तुळजापूरमध्ये दाखल होत असतात.

यंदा सलग सुट्ट्या असल्यानं भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्यामुळे मंदिर संस्थानकडून विशेष नियोजन करण्यात आलं असनू ३१ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजल्यापासून ते ५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेपर्यंत सर्व भाविकांना बीडकर पायऱ्यांमार्फत मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे.

या महोत्सवानिमित्त काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असनू याकाळात व्हीआयपी दर्शन आणि रेफरल दर्शन पास पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच ३१ मार्च ते २ एप्रिल दरम्यान ५०० रुपयांचा स्पेशल देणगी दर्शन पासही बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थाननं घेतला आहे. दरम्यान २०० रुपयांचं सशुल्क देणगी दर्शन पासधारक, अभिषेक पासधारक तसेच धर्म दर्शन आणि मुख दर्शन घेणाऱ्या सर्व भाविकांना बीडकर पायऱ्या मार्गेच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे.

चैत्र पौर्णिमा महोत्सव भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचा आणि उत्साहाचा सोहळा मानला जातो. त्यामुळे या उत्सवा दरम्यान भाविकांना तूळजाभवानी देवीचं योग्य दर्शन घेता यावं याकरिता विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >