कृत्रिम बुद्धिमत्ता : शाप की वरदान?

तंत्रज्ञान : प्रा. प्रवीण पांडे


मित्रांनो संगणक आणि यंत्रमानव या विषयांवर सातत्यपूर्णतेने होणाऱ्या संशोधनाने फार मोठ्या प्रमाणात उत्क्रांती होत आहे. रोज याबद्दल नवनवीन वार्ता कानावर येत आहेत. सध्याच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हा संगणक क्षेत्रातील परवलीचा शब्द आहे. त्यासोबतच मशीन लर्निंग (एमएल), डीप लर्निंग (डीएल), नॅचरल लँगवेज प्रोसेसिंग (एनएलपी), नॉलेज, बेस सिस्टीम्स(केबीएस) न्यूरल नेटवर्क्स हे एआयचे उपसंच म्हणविले जातात.


एआयद्वारे कोणती कामे करता येऊ शकतात?


ओळख आणि वर्गीकरण एआय स्पॅम कॉल्स किंवा प्रतिमा ओळखण्यात पटकन आणि अचूकपणे मदत करते. फोन कंपन्या आणि बँकांसारख्या संस्था एआयचा वापर करून अनावश्यक किंवा घातक संभाषण/फोन कॉल्स वर्गीकृत करतात.


पूर्वानुमान आणि विश्लेषण
एआय भविष्यातील घटनांचा अंदाज लावू शकते, जसे की विमान उड्डाणांचा विलंब किंवा रोगांची शक्यता. आरोग्य क्षेत्रात ते लक्षणांपूर्वी आजार ओळखते आणि वैद्यकीय प्रतिमा विश्लेषित करते.


स्वयंचलन आणि कार्यक्षमता
एआय कंटाळवाणी कामे ऑटोमेट करते, जसे ग्राहक सेवा, डेटा एंट्री किंवा इन्व्हेंटरी व्यवस्थापन.कारखाने, ऑफिसेस आणि सेवा क्षेत्रात ते कार्यक्षमता वाढवते.


सर्जनशीलता आणि उत्पादनक्षमता
एआय इमेज, टेक्स्ट, ऑडिओ किंवा व्हिडीओ तयार करू शकते, जसे चॅटजीपीटी किंवा इमेज जनरेटर्स. स्मार्टफोन वापरताना किंवा गुगल असिस्टंटसारखे सहायक वापरून दैनंदिन जीवन सुलभ झाले आहे.


इतर अनुप्रयोग सुरक्षा : सायबर हल्ले रोखणे किंवा आपत्ती व्यवस्थापन.


शिक्षण आणि व्यवसाय : वैयक्तिक शिक्षण किंवा नवीन उत्पादने सुचवणे.


पर्यावरण : वाहन उत्सर्जन कमी करणे किंवा नैसर्गिक आपत्तींचा अंदाज लावणे.


अचूकता आणी अथकपणे कार्यरत असण्याची क्षमता एआयद्वारे केलेली कामे ही अत्यंत अचूक असतील. तसेच एआय हे तंत्रज्ञान मशीनद्वारे वापरले जाणार आहे. त्यामुळे मशीन थकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे अति श्रमामुळे होणाऱ्या त्रुटी किंवा चुकांची शक्यता अत्यंत नगण्य असेल. इथे सांगितलेले उपयोग हे एआयचे अगदी जुजबी उपयोग आहेत. एआय हे असे तंत्रज्ञान आहे ज्यांची व्याप्ती फार मोठी आहे, असे म्हणू या की येणाऱ्या काळात एआय वापरावर कोणत्याही मर्यादा असू शकणार नाहीत. वरील सर्व मुद्दे हे एआयची भलावणं करणारे आहेत. पण एआयच्या वापराने काय नुकसान असू शकते किंवा त्याचे दुष्परिणाम काय असू शकतात यावर देखील ऊहापोह व्हायला पाहिजे.


संगणक क्षेत्रात झालेली प्रचंड उत्क्रांती पाहता एकदिवस हे संगणक मानवाचा रोजगार हिरावून घेतील अशी एक भीती लोकांमध्ये निर्माण झाली होती आणि सध्या देखील आहे. काही अंशी यांचे परिणाम हे सकृतदर्शनी त्याच दिशेने जाताना दिसून येत आहेत. या विषयावर मंथन देखील नित्य सूरू असते. त्यात काल्पनिक बाबींवर जास्त भर असल्याचे दिसून येते. भरीस भर म्हणून रोबोट्स,(Robotics), कृत्रिम बुद्धिमत्ता (Artifisial Intiligence), ज्ञानावर आधारित प्रणाली (Knoledge Based Systems, KBS) मशीन शिक्षण ( ML) Deep लर्निंग (DL) अशा नवनवीन शोधामुळे तर अजूनच आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. मानवी बुद्धिमत्तेच्या मदतीने करावयाची अनेक कामे या अत्याधुनिक प्रणलींच्या माध्यमातून आपण करून घेत आहोत. यात मुख्यत्वे करून (एआय) प्रणाली अत्यंत प्रभावीपणे वापरण्यात येत आहे.


अनेक लहान लहान AAPS वापरून कठीण वाटणारी अनेक कामे मानव मशिन्सकडून करवून घेत आहे. अशा या परिस्थितीत वर दर्शविलेली भीती ही अगदीच अनाठायी आहे, असे म्हणणे हे धरिष्ट्याचे होईल. उलटपक्षी नित्य नूतन प्रकट होणाऱ्या अशा आधुनिक तंत्रज्ञानामुळे ही भीती बऱ्याच अंशी सार्थ ठरत आहे. येणाऱ्या काळात ह्या प्रश्नातून सोडणूक कशी व्हावी यावर अनेक विचारवंत चिंतन करीत आहेत. सर्वात भयंकर मुद्दा असा आहे की, यामुळे संगणक किंवा यांत्रिक क्षेत्रातील रोजगार निर्मितीचे प्रमाण अत्यंत कमी होईल. त्यामुळे बेरोजगारी वाढीस लागेल.
आजमितीला या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पाहिजे तितक्या प्रमाणात उपलब्ध नाहीत.


अनेक संगणकीय प्रणालीमध्ये असणाऱ्या कपंन्यातून सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना एआय स्किल्स आत्मसात करण्याबद्दल सूचना (तंबी) देण्यात येत आहे. अन्यथा त्यांच्या नोकरीवर गदा येऊ शकते. म्हणजे या सर्व मनुष्यबळास नवीन कौश्यल्ये शिकणे क्रमप्राप्त ठरेल. त्याकरिता लागणारा वेळ आणि पैसा हा एक वेगळाच विषय आहे. तसेच वयाने प्रौढत्वाकडे वाटचाल होत असणाऱ्या सर्वांनाच हे कौश्यल्य आत्मसात करणे कितपत शक्य होईल हा मुद्दा देखील कळीचा ठरू शकेल. महत्त्वाचा एक मुद्दा असा की एआय प्रणालीचा होऊ शकणारा गैरवापर. याकरिता अनेक विचारवंत निरंतर उपाययोजना करण्याबद्दल क्रियाशील आहेत.


मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे संस्थापक व मालक असणाऱ्या बिल गेट्स या संगणक क्षेत्रातील ज्ञानवंत संशोधकाने नुकतेच भविष्यातील नोकऱ्यांच्या विषयी भविष्यवाणी केली.
सन २०२५ मध्ये, बिल गेट्सने एक धाडसी भविष्यवाणी केली ज्याने कर्मचाऱ्यांना हादरवून टाकले.
कृत्रिम बुद्धिमत्ता प्रत्येक उद्योगात बँकिंगपासून ते ग्राहक सेवेपर्यंत आणि अगदी कलाक्षेत्रात देखील पसरत असताना, गेट्सने खुलासा केला की तीन रोजगार खरोखरच मानवी राहतील, असा त्यांचा विश्वास आहे. ती कामे एआय करू शकत नाहीत म्हणून नाही - परंतु आम्हाला ते नको आहे म्हणून.


१. अध्यापन.
गेट्सचा असा विश्वास आहे, की महान शिक्षक अपरिवर्तनीय आहेत. एआय निश्चितपणे धडे देऊ शकते.
परंतु मानवी कनेक्शन - शिक्षकाला ज्या प्रकारे एखाद्या मुलाची बुद्धिमत्ता समजते, शिक्षक हा विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण करू शकतो किंवा अपयशानंतर त्यांना सांत्वन देतो - असे या प्रणालीकरिता कोणतेही अल्गोरिदम प्रतिकृती बनवू शकत नाही. भावनिक मार्गदर्शन आणि मानवी मार्गदर्शन हे शिक्षणाचा आत्मा राहतील.


२. आरोग्य सेवा.
एआय निदान आणि शल्यक्रिया सुस्पष्टतेमध्ये क्रांती घडवून आणेल; परंतु गेट्सचा आग्रह आहे की, लोकांना अजूनही मानवी डॉक्टर आणि परिचारिका हव्या असतील.
सहानुभूती, विश्वास आणि बेडसाइड काळजी डाउनलोड केली जाऊ शकत नाही.
सर्वात शक्तिशाली औषध म्हणजे, करुणा - आणि कोणत्याही मशीनने कधीही त्यात प्रभुत्व मिळवले नाही.


३. बांधकाम आणि दुरुस्ती.
टेक ब्रेकथ्रू असूनही, गेट्सचा असा विश्वास आहे की प्लंबिंग, इलेक्ट्रिकल काम आणि इमारत यासारखे व्यापार वाढतील. घरे, रस्ते आणि शहरे अजूनही हातांनी आवश्यक आहेत. अशी अनेक क्षेत्रे असू शकतील.
ते काहीका असेना, तरुणांनी ही सर्व आव्हाने स्वीकारून सर्व नवनवीन कौशल्ये आत्मसात करून या क्षेत्रात देखील भरारी घेऊन आपली यशस्विता सिद्ध करून राष्ट्राच्या प्रगतीस हातभार लावणे आवश्यक वाटते.

Comments
Add Comment

अक्कलहुशारीने दृश्याचे चित्रीकरण

स्मृतिपटल : अनिल तोरणे  ‘बाजी’, ‘जाल’, ‘आरपार’, ‘सीआयडी’, ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘चौदहवीं का चांद’, ‘काला बाजार’,

तुका म्हणे ऐशा नरा...

प्रासंगिक : भागा वरखडे अलीकडच्या काळात नगर आणि नाशिक जिल्ह्यात दाखल झालेले गुन्हे तसेच देशभरात विविध ‘बाबां’वर

सदाचार

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे पद्मपुराणानुसार एकदा नारदाने ब्रह्मदेवांना सदाचार म्हणजे काय असा प्रश्न

इस बातका वादा कर लो...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे  वर्ष होते १९६६, म्हणजे बरोबर ६० वर्षांपूर्वीचे! सिनेमाचे नाव अत्यंत गूढ आणि

तुमचं छोटंसं हसू बदलू शकतं मुलांचं आयुष्य

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी आपण चांगले कपडे घालतो. स्त्रिया आकर्षक अलंकार घालतात,

एक गोड आठवण

नक्षत्रांचे देणे; डॉ. विजया वाड मी विश्वकोशाची अध्यक्षा होते,तेव्हा वाईला प्रत्येक महिन्यात माझा दहा दिवस