Sunday, March 29, 2026

एप्रिलमध्ये तब्बल इतके बँक हॉलिडेज, ही सुट्ट्यांची यादी जाहीर

एप्रिलमध्ये तब्बल इतके बँक हॉलिडेज, ही सुट्ट्यांची यादी जाहीर

मुंबई : एप्रिल महिन्यात कुठे फिरायला जायचा प्लॅन करत असाल, तर बाहेर गावी जायच्या आधी बँक हॉलिडेज नक्की तपासून घ्या, एप्रिल महिण्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होत आहे आणि त्याचसोबत बँकांनी आपल्या सुट्ट्यांची यादी देखील जाहीर केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्यांच्या आयडीनुसार, पुढील महिन्यात तब्बल १४ दिवस बंद राहणार आहेत, ज्यामध्ये रविवार आणि दुसरा व चौथा शनिवार तसेच काही सण आणि विशेष प्रसंगाचा समावेश आहे.

एप्रिल महिन्यात किती दिवस राहतील बँक बंद पहा ही यादी...

१ एप्रिल (बुधवार): वार्षिक बंदमुळे देशभरातील बँका बंद राहतील. २ एप्रिल (गुरुवार): मौंडी थर्सडे निमित्त कोची आणि तिरुवनंतपुरम येथील बँका बंद राहतील. ३ एप्रिल (शुक्रवार): गुड फ्रायडे निमित्त देशभरात बँकांना सुट्टी असेल. ५ एप्रिल (रविवार): सर्व बँकांना साप्ताहिक रविवारची सुट्टी असेल. ११ एप्रिल (शनिवार): महिन्यातील दुसऱ्या शनिवारची सुट्टी असेल. १२ एप्रिल (रविवार): सर्व बँका रविवारी बंद राहतील. १४ एप्रिल (मंगळवार): डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती/महाविषुव संक्रांती/बिजू/बुईसू उत्सव/तमिळ नववर्ष दिन/बोहाग बिहू/चिराओबा/बैसाखी निमित्त देशभरातील विविध राज्यांमध्ये बँका बंद राहतील. १५ एप्रिल (बुधवार): बंगाली नववर्ष दिन (नबवर्षा)/बोहाग बिहू/विशू/हिमाचल दिन – आगरतळा, गुवाहाटी, इटानगर, कोची, कोलकाता, शिमला आणि तिरुवनंतपुरम येथील बँका बंद राहतील. १६ एप्रिल (गुरुवार): बोहाग बिहू निमित्त गुवाहाटीतील बँका बंद राहतील. १९ एप्रिल (रविवार): देशभरातील सर्व बँका बंद राहतील. २० एप्रिल (सोमवार): बसव जयंती/अक्षय तृतीयेनिमित्त बंगळूरसह अनेक राज्यांतील बँका बंद राहतील. २१ एप्रिल (मंगळवार): गारिया पूजेनिमित्त आगरतळा येथील बँका बंद राहतील. २५ एप्रिल (शनिवार): महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील. २६ एप्रिल (रविवार): देशभरातील सर्व बँकांना रविवारची साप्ताहिक सुट्टी असेल.

बँका जरी बंद असल्या तरी युपीआय सेवा ही आपल्या हातात म्हणजेच आपल्या फोन मध्ये कायम उपलब्ध तर आहेच. त्यामुळे लक्षात ठेवा पुढील काही दिवस बँकवर अवलंबून न राहता आपला युपीआय सिस्टीम अपडेट करा.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >