मुंबई : नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) या दोन्ही ठिकाणी पुढल्या आठवड्यात फक्त तीन दिवस कामकाज चालणार आहे. यामुळे शेअर बाजार फक्त तीन दिवस सुरू असेल. उर्वरित चर दिवस सुटी असेल. यापैकी शनिवार आणि रविवारी शेअर बाजाराला सुटी असते. या आठवड्यात महावीर जयंतीनिमित्त मंगळवार ३१ मार्च आणि शुक्रवार ३ एप्रिल रोजी रामनवमीनिमित्त शेअर बाजाराला सुटी असेल.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया, देशातील सर्वात मोठे कमोडिटी एक्सचेंज, महावीर जयंतीला पूर्णपणे बंद राहणार नाही. सकाळचे ट्रेडिंग सत्र बंद राहील, त्यामुळे दिवसा कोणताही व्यापार होणार नाही. सायंकाळचे सत्र नेहमीप्रमाणे सुरू होईल आणि व्यापार सुरू राहील. याचा अर्थ या दिवशी केवळ अर्ध्या वेळेसाठी व्यापार होईल.
गुड फ्रायडेला एमसीएक्स (MCX) पूर्णपणे बंद राहील. या दिवशी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या सत्रात कोणताही व्यापार होणार नाही.
- सोमवार ३० मार्च २०२६ - NSE, BSE सुरू राहणार
- मंगळवार ३१ मार्च २०२६ - महावीर जयंती; NSE, BSE बंद
- बुधवार १ एप्रिल २०२६ - NSE, BSE सुरू राहणार
- गुरुवार २ एप्रिल २०२६ - NSE, BSE सुरू राहणार
- शुक्रवार ३ एप्रिल २०२६ - रामनवमी; NSE, BSE बंद
- शनिवार ४ एप्रिल २०२६ - NSE, BSE बंद
- रविवार ५ एप्रिल २०२६ - NSE, BSE बंद






