Saturday, March 28, 2026

Rinku Rajguru : रिंकू राजगुरुनं दिली प्रेमाची कबुली, तुझ्या प्रेमात वेडी झालीये म्हणत केली 'ही' पोस्ट

Rinku Rajguru : रिंकू राजगुरुनं दिली प्रेमाची कबुली, तुझ्या प्रेमात वेडी झालीये म्हणत केली 'ही' पोस्ट

मुंबई : महाराष्ट्राची आर्ची म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री रिंकू राजगूरू ही सोशल मिडियावर सक्रिय असून रिंकूचा आयुष्यातील खरा परशा कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.

रिंकु सतत आपलं कुणासोबतही काही रिलेशन नाही असं सांगत असते. पण, काही दिवसांपूर्वीच तिनं तिच्या आयुष्यात कुणीतरी होतं याची कबुली दिली होती. अशातच आता रिंकूनं इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्याची सुरुवात डार्लिंग अशी आहे आणि तुझ्या प्रेमात वेडी झालीये, असं रिंकू सांगते. रिंकूनं तिच्या पोस्टला 'आय एम सो इन लव्ह विथ यू' हे इंग्रजी गाणं लावलं आहे. या गाण्यात मी तुझ्या प्रेमात पडले आहे. तुझ्यासाठी वेडी झाले आहे. तुझ्यावरून क्षणभरही नजर हटवू शकत नाही, अशा ओळी आहेत. या पोस्टमध्ये रिंकूनं आपल्या प्रेमाची कबूली दिली आहे. मात्र, ही कबूली देत रिंकूनं या पोस्टमध्ये खाली एक नावही दिलं आहे.

रिंकूनं ज्याच्यासाठी ही पोस्ट केली आहे त्याचं नाव रोमिओ आहे. पण, हा रोमिओ तिचा प्रियकर नसून हा रिंकूचा पेट डॉग आहे. रिंकूने याच पोस्टमध्ये फोटोही टाकला आहे ज्यामध्ये एक छोटा टेडी आणि त्याच्यामागे छोटा पपी अर्थात रिंकूचा रोमिओ दिसत आहे. या फोटोत रिंकूनं रोमिओ नावासोबत हार्ट आणि डॉगचे फुटप्रिंट्सही टाकले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >