Saturday, March 28, 2026

BMC : मुंबई महापालिकेच्या सहआयुक्त पदी एम. देवेंदर सिंह, गंगाधरण यांची बदली

BMC : मुंबई महापालिकेच्या सहआयुक्त पदी एम. देवेंदर सिंह, गंगाधरण यांची बदली

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबई महापालिकेतील सर्वात निष्क्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे सहआयुक्त गंगाधरण डी, यांची बदली झाली असून त्यांच्या रिक्त जागी एम. देवेंदर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आय ए एस अधिकारी असलेले डी. गंगाधरण यांची नियुक्ती मुंबई महापालिकेच्या सह आयुक्तपदी झाल्यानंतर त्यांच्याकडे शिक्षण आणि दक्षता विभागाचा भार सोपवला होता. पण नंतर त्यांच्याकडील शिक्षण विभागाची जबाबदारी काढून केवळ त्यांच्याकडे केवळ दक्षता विभागाची जबाबदारी होती. पण त्यांना महापालिकेत आपल्याला सिद्ध करता आले नाही आणि हे पद एका सनदी अधिकाऱ्याच्या हाती असूनही त्या पदाला न्याय मिळत नव्हता. त्यामुळे गंगधरण यांच्या विरोधात प्रचंड नाराजी होती.

राज्याच्या सामान्य प्रशासनाच्या वतीने सनदी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांची नियुक्ती केल्याचे आदेश प्राप्त झाले असून त्यांना त्वरित गंगाधरण याच्याकडून त्वरित पदभार स्वीकारण्याचे कळवले आहे.

महापालिकेत यापूर्वी नियुक्त सनदी अधिकारी अजित कुंभार यांची बदली झाल्यानंतर गंगाधरण यांची नियुक्ती मुंबई महापालिकेत सह आयुक्त पदी झाली होती. पण आपल्या या सेवा कालावधीत कुठेही त्यांना चमक दाखवता आली नाही. किंबहूना सनदी अधिकारी नियुक्त असूनही या खात्यांचा कारभारात बदल घडवून आणता आला नाही. या पदावर या पूर्वी सनदी अधिकारी आर. ए राजीव,डॉ. सतीश भिडे, व्हि. राधा. विकास खरगे,निधी चौधरी, अजित कुंभार, आशुतोष सलील अशा काही अधिकाऱ्यांनी नियुक्ती झाल्यानंतर या पदाचा भार स्वीकारत या पदाला न्याय दिला होता आणि आपले नाव वेगवेगळ्या माध्यमातून महापालिकेत कोरले होते. त्यामुळे त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे आजही त्यांच्या कामाची दखल आणि त्याचे नाव अधिकाऱ्यांसह जनतेच्या मुखावर आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा