Saturday, March 28, 2026

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरातील 'हा' सदस्य बाहेर जाणार ?

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरातील 'हा' सदस्य बाहेर जाणार ?
मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन सध्या दोरदार चर्चेत आहे. बिग बॉस मराठीला ७० दिवस झाले आहेत. तर, आता शेवटचे ३० दिवस राहिले असून दिवसेंदिवस गेम अधिकच कठीण होत चालला आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धक घरात टिकून राहण्यासाठी आपआपला गेम दाखवत असल्याचे पाहायला मिळत आहे.

बिग बॉस मराठीचे ७० दिवस होऊन आता शेवटचे ३० दिवस राहिले असतानाच प्रेक्षकांमध्ये यंदा बिग बॉस मराठी कोण जिंकणार याची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. नुकताच बिग बॉसमध्ये फॅमिली विक पार पडला. या फॅमिली विकमध्ये प्रेक्षकांनी प्रभू शेळकेचा त्याचा कुटुंबासोबत भावनिक क्षण पाहिला होता.

प्रभू सध्या अजून एक दोन आठवडे घराबाहेर जाणार नाही असं प्रेक्षकांना वाटत होतं. पण, आता प्रभू शेळकेचं एलिमिनेशन होणार असल्याच्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे.

प्रभू शेळके हा बिग बॉसच्या घरात छोटा डॉन म्हणून ओळखला जातो. त्याची विनोदी आणि हटके स्टाईल कायम चर्चेत असते. प्रभू जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्याचा असून अत्यंत गरीब कुटुंबातून आलेला आहे. प्रभूनं सोशल मीडियावर स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली. प्रभूला थॅलेसेमिया नावाचा गंभीर आजार आहे. या आजाराच्या उपचारांसाठी मोठा खर्च करावा लागतो. पण त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या उपचारांसाठी वावर विकल्याचंही तो अनेकदा सांगताना दिसतो.

बिग बॉस मराठीच्या ११व्या आठवड्यात प्रभू एलिमिनेट झाल्याची चर्चा जोरात रंगली आहे. मात्र, बिग बॉसकडून किंवा कलर्स मराठीकडून प्रभू घराबाहेर जाण्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा