Saturday, March 28, 2026

शरीर सुखाच्या मागणीला नकार देताच अभिनेत्यानं केली हत्या, मिरारोडमध्ये घडला धक्कादायक प्रकार

शरीर सुखाच्या मागणीला नकार देताच अभिनेत्यानं केली हत्या, मिरारोडमध्ये घडला धक्कादायक प्रकार

मुंबई : मुंबईतील मीरा रोड परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका अभिनेत्याने आपल्याच घरात काम करणाऱ्या ३७ वर्षीय मोलकरणीची हत्या केली असून हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी त्याला विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावरून अटक केली आहे.

या संशयित आरोपीचं नाव आशिष मेश्राम असं आहे. तो टेलिव्हिजन अभिनेता असून त्यानं काही मालिकांमध्ये काम केलं आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

माहितीनुसार, ललिता (नाव बदललं आहे) या मीरा रोडच्या 'चंद्रेश अकॉर्ड' सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये घरकाम करत होत्या. बुधवारी रात्री आरोपी आशिष मेश्रामनं ललिता यांच्या गळ्यावर, छातीवर आणि पोटावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात ललिता यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपीनं पळ काढला होता. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याला आंध्र प्रदेशातून अटक केली आहे.

या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून आरोपी आशिष गेल्या अनेक दिवसांपासून ललिता यांच्याकडे शरीर सुखाची मागणी करत होता. ललिता यांनी ही मागणी वारंवार धुडकावून लावली होती. तरीही आरोपी वारंवार तिचा छळ करत होता. धक्कादायक बाब म्हणजे जानेवारी महिन्यात आरोपीनं ललिता यांच्या मुलाला फोन करून धमकी दिली होती की, "तुझ्या आईनं माझ्याकडे काम करणं बंद केलं किंवा माझ्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर मी तिला जीवे मारीन."

मयत महिला या काशीमीरा भागात आपल्या पती आणि ४ मुलांसह राहत होत्या. त्यांचे पती चर्मकार असून, ललिता स्वतः ८-९ घरांमध्ये काम करून कुटुंबाला हातभार लावत होत्या. गेल्या तीन वर्षांपासून त्या मेश्राम यांच्याकडे काम करत होत्या. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या धक्कादायक प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा