Friday, March 27, 2026

विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; नवी मुंबई विमानतळावरून जोडली जाणार ही ३० शहरे

विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; नवी मुंबई विमानतळावरून जोडली जाणार ही ३० शहरे

नवी मुंबई : नवी मुंबईतील दि. बा. पाटील या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हवाई प्रवासाचा विस्तार होत असून लवकरच नवीन शहरांशी जोडणी होणार आहे. नवी मुंबई विमानतळ प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या वेळापत्रकानुसार प्रवाशांना आता देशातील अनेक शहरांसाठी थेट सेवा उपलब्ध होणार आहे.

सध्या मर्यादित शहरांपर्यंतच उपलब्ध असलेली सेवा आता मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येत आहे. २९ मार्चपासून लागू होणाऱ्या उन्हाळी वेळापत्रकानुसार ऑक्टोबरपर्यंत प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध असणार आहेत.

या नव्या नियोजनानुसार देशांतर्गत एकूण ४६ शहरांपर्यंत उड्डाणे उपलब्ध होणार आहेत. यामध्ये काही प्रमुख मार्गांवर दररोज अनेक फेऱ्या असतील. विशेषतः दिल्ली, गोवा आणि बेंगळुरू या शहरांसाठी उड्डाणांची संख्या लक्षणीय राहणार आहे.

याशिवाय हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, वाराणसी आणि इंदूर यांसारख्या शहरांसाठी नियमित सेवा उपलब्ध राहणार आहे. तसेच तर आग्रा, औरंगाबाद, अयोध्या, बागडोगरा, बरेली, बेळगाव, भावनगर, भोपाळ, चंदीगड, देहराडून, दिऊ, दुर्वापुर, गोवा, गोरखपूर, हिंडन, राजकोट, हुबळी जबलपूर, जम्मू, झारसुगुडा, कन्नूर कोल्हापूर, मदुराई, पटना, रायपूर, श्रीनगर, तिरुपती, तिरुवनंतपूरम तसेच विशाखापट्टणम यांसारख्या विविध शहरांनाही या विमानतळातून जोडले जाणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >