सोशल मिडियावर चाहते बिग बॉस मराठी ६ चा विजेता यंदा कोण ठरणार? याची चर्चा करत असून बिग बॉस मराठी 6 चा ग्रँड फिनाले कधी पार पाडणार याविषयी प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.
बिग बॉसच्या एका प्रोमोमुळे प्रेक्षकांना बिग बॉसच्या फिनालेच्या तारखेचा अंदाज आला असून यंदा सीझनचा ग्रँड फिनाले १९एप्रिल २०२६ ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या सोशल मिडियावर ग्रँड फिनाले च्या तारखे विषयी जोरदार चर्चा सुरू असून फॅमिली वीकमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आलेल्या संकेत पाठकच्या पत्नीने जाता जाता केलेल्या एका वाक्यामुळे प्रेक्षकांना फिनालेची हिंट मिळाली आहे. "आता आपण 19 एप्रिलला भेटू." असं म्हटल्याची चर्चा आहे.
मात्र, याबाबत कलर्स मराठी वाहिनीकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचे ७०दिवस भरले असून आता तीस दिवसांचा गेम राहिलाय. बिग बॉस ६ चा ग्रँड फिनाले कधी पार पाडणार आणि यंदाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये प्रचंड वाढली आहे.






