Friday, March 27, 2026

Excise Duty on Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Excise Duty on Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

कच्च्या तेलाच्या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात करत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर ₹१३ वरून थेट ₹३ पर्यंत कमी करण्यात आले असून, डिझेलवरील ₹१० प्रति लिटर उत्पादन शुल्क पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे. या निर्णयामुळे इंधनाच्या वाढत्या किमतींना काही प्रमाणात आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

उत्पादन शुल्क म्हणजे काय?

उत्पादन शुल्क हा केंद्र सरकारकडून वस्तूंच्या उत्पादनावर आकारला जाणारा अप्रत्यक्ष कर असतो. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये या कराचा मोठा वाटा असतो. याशिवाय राज्य सरकारांकडून व्हॅट (VAT) देखील आकारला जातो. उत्पादन शुल्क कमी केल्याने थेट इंधनाच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो.

नायरा एनर्जीची दरवाढ :

दरम्यान, नायरा एनर्जीने (Nayara Energy) नुकतीच पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ₹५ आणि डिझेलच्या दरात ₹३ वाढ केली आहे. स्थानिक कर आणि व्हॅटनुसार ही दरवाढ वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलू शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी इशारा दिला होता की, जर आंतरराष्ट्रीय संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिला, तर त्याचे गंभीर आर्थिक परिणाम होऊ शकतात. केंद्र सरकारने मात्र देशात पेट्रोल, डिझेल किंवा गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले असून, पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारताकडे सुमारे ६० दिवसांसाठी पुरेसा इंधनसाठा उपलब्ध आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा