Friday, March 27, 2026

Ashok Kharat Case Update: अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर, भोंदूबाबाची HIV टेस्ट पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?

Ashok Kharat Case Update: अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर, भोंदूबाबाची HIV टेस्ट पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?

नाशिक: नाशिकमधील भोंदुबाबा अशोक खरातच्या अत्याचार प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकीय, सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. भविष्य सांगण्याच्या बहाण्याने या नराधमाने शेकडो महिलांवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर येत आहे. अल्पवयीन मुली, विवाहित स्त्रिया, गरोदर महिलाही नराधम खरातच्या वासनेच्या शिकार झाल्याचं उघड झालं असून त्याचे व्हिडिओही समोर येत आहेत. याच प्रकरणात आता सर्वात मोठी अपडेट समोर आली असून अशोक खरातची एचआयव्ही टेस्ट करण्यात आली आहे.

अशोक खरातची एचआयव्ही टेस्ट

याबाबत सविस्तर वृत्त असे की, महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणी न्यायालयाने अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या या प्रकरणाची एसआयटीकडून कसून चौकशी सुरु आहे. याचप्रकरणी अशोक खरातच्या काही वैद्यकीय चाचण्याही करण्यात आल्या होत्या. यापैकी एचआयव्ही चाचणीचा रिपोर्टही समोर आला आहे. नाशिक पोलिसांनी अशोक खरात याची एचआयव्ही टेस्ट केली असून त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

दुसरीकडे, एसआयटीकडून अशोक खरातच्या नाशिकच्या ओकस कार्यालयात जवळपास दीड तास झाडाझडती घेतली. या झडतीमध्ये त्याच्या कार्यालयातून तंत्र मंत्र करण्यासाठीच्या वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये तांब्याची एक बाटली, गंडे दोरे, खडे तसंच काही महिलांचे केसही हाती लागले आहेत.

महागडी कस्तुरीच्या नावाने बाबा बोगस कस्तुरी बनवत होता असा तपास यंत्रणांना संशय असून ते बनवण्यासाठीचा कच्चामाल तसंच अत्तराच्या काही बाटल्या सुद्धा सापडल्या आहेत. पूजा विधी आटोपल्यानंतर बाबा वापरत असलेले हँड सॅनिटायझर सुद्धा जप्त करण्यात आले आहे. आर्थिक व्यवहारांची काही कागदपत्रही मिळाल्याचं बोलले जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा