Thursday, March 26, 2026

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याचा कोकणात अपघात, उंच चढावरून घसरली बाईक

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याचा कोकणात अपघात, उंच चढावरून घसरली बाईक

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोममधून घराघरात पोहचलेला लोकप्रिय अभिनेता निखिल बने याचा कोकणात बाईक राईड करताना अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानं स्वतः त्याचा अपघात झाल्याची माहिती सोशल मीडियावर एका व्हिडिओतून दिली सुदैवानं निखिलला गंभीर दुखापत झालेली नाही. तो किरकोळ जखमी झालाय. त्याच्या हातापायाला दुखापत झाल्याचं त्यानं व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे.

निखिल बने सध्या 'कोको राईड' नावाची एक युट्युब ब्लॉग सिरीज करत आहे. या सिरीजच्या शूटसाठी तो कोकणात मंडणगड-दापोली परिसरात बाईकवर फिरत होता. त्यावेळी हिंमतगडाकडे जाताना हा अपघात झाल्याचा त्यांने सांगितलं आहे.

या गावातील एका उंच चढावरून जात असताना त्याची बाईक अचानक घसरली आणि त्यामुळे त्याला गाडीवर नियंत्रण ठेवता आलं नाही, असं त्याने यावेळी सांगितलं. या अपघातात त्याच्या हाताला आणि पायाला दुखापत झाल्याचेही त्याने सांगितले आहे.

या व्हिडिओत बोलत असताना तो म्हणाला की 'इतकं छान वाटतंय, वेगवेगळे लोक येतात. प्रेमाने बोलतायत. प्रत्येक ठिकाणी मला हा अनुभव येतोय. खूप गोड माणसं आहेत. फिरलं पाहिजे. ' पुढे तो म्हणाला , ' एक प्रॉब्लेम झाला. हिम्मतगडाकडे जाताना एक छोटसं गाव आहे. तिथून उजवीकडून मी वर जात होतो. तिथे चढ होता. मला गाडी कंट्रोल झाली नाही . मी तिथे पडलो. त्याचवेळी बाईक वरून जाणारे दादा होते, ते खारी-बटर विकतात त्यांनी मला मदत केली. त्या गावातल्या बायकांनी मला पाणी विचारलं मदत केली. कोकणातल्या बऱ्याच लोकांचं कौतुक आहे. इथल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. या सगळ्यांची नाव मला माहित नाहीत पण चेहरे कधीच नाही विसरू शकणार.'

 
View this post on Instagram
 

A post shared by Nikhil Bane (@banenikhil)

निखिलच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. तर काहीजणांनी त्याने कोकणातील कोणत्या ठिकाणांना भेट द्यावी याबद्दल कमेन्टस केले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा