Wednesday, March 25, 2026

माधुरी दीक्षितच्या सौंदर्याची सर्वांना भुरळ, 'या' गोष्टींमुळे अजूनही दिसते इतकी सुंदर

माधुरी दीक्षितच्या सौंदर्याची सर्वांना भुरळ, 'या' गोष्टींमुळे अजूनही दिसते इतकी सुंदर

मुंबई - बॉलिवूडची धक-धक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित ५८ वर्षांची असूनही माधुरीच्या सौंदर्यांची भुरळ अनेकांना पडत आहे. माधुरी दीक्षितची सुंदरता आणि फिटनेसमुळे तिच्या वयाचा अंदाजही लावता येत नाही. चला तर जाणून घेऊयात माधुरी दीक्षितच्या परफेक्ट सुंदरतेचं नेमकं रहस्य काय आहे?

माधुरी दीक्षितचं स्किनकेअर रुटीन

संतुलित आहार : रणवीरच्या एका शो दरम्यान माधुरीनं सांगितलं की नेहमी हेल्दी आहाराचं सेवन करणं महत्वाचं आहे. यामुळे आपल्या त्वचेचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.

हायड्रेशन : आपल्या चेहऱ्यासाठी हायड्रेशन खुप महत्वाचं आहे. त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्यावं.

स्किनकेअर रुटीन : अभिनेत्री माधुरी दीक्षित चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी स्किनकेअर रुटीनचं पालन करते. यामध्ये क्लींझिंग, टोनिंग, सीरम आणि मॉइस्चरायझिंगचा समावेश आहे.

मानसिक शांती : माधुरी दीक्षित स्किनकेअरसोबतच नियमितपणे मेडिटेशन करण्यालाही महत्व देते. हे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतं.

सकारात्मक दृष्टिकोन : एका शो दरम्यान माधुरी दीक्षितनं सांगितलं की ती नकारात्मक विचांरापासून दूर असते. ती नेहमी स्वत:ला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. यामुळे आपलं ब्लड सर्क्यूलेशन वाढत ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.

कोण आहे माधुरी दीक्षित ?

भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने हिचा जन्म १५ मे १९६७ रोजी मुंबईत झाला. माधुरीला 'धक धक गर्ल' आणि 'बॉलिवूडची डान्सिंग क्वीन' म्हणून ओळखले जाते. माधुरी एक प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगना आहे. तिनं सुमारे आठ वर्षे नृत्याचे शिक्षण घेतले आहे. आजही मनमोहक हास्य, लक्षवेधी नृत्य आणि कौतुकास्पद अभिनय यामुळे माधुरीच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलेल्या माधुरीला अरिन आणि रायन अशी दोन मुले आहेत.

माधुरीनं १९८४ मध्ये 'अबोध' चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. 'तेजाब', 'राम लखन', 'बेटा', 'हम आपके हैं कौन' आणि 'दिल तो पागल है' यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांत तिनं काम केलं आहे. माधुरीला उत्कृष्ट अभिनयासाठी अनेक 'फिल्मफेअर' पुरस्कार मिळाले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा