Monday, March 23, 2026

वांद्रे पश्चिम भागांत शनिवारी, रविवारी पाणीकपात

वांद्रे पश्चिम भागांत शनिवारी, रविवारी पाणीकपात

मुंबई: पाली हिल जलाशयाच्‍या पाणी पातळीत सुधारणा करण्‍यासाठी वांद्रे पश्चिम येथील रामदास नायक मार्ग, स्‍वामी विवेकानंद मार्ग आणि आर. के. पाटकर मार्ग जंक्‍शन या दरम्‍यान ७५० मिलीमीटर व्‍यासाची मुख्‍य जलवाहिनी नव्‍याने टाकण्यात आली आहे. ही नवीन मुख्‍य जलवाहिनी कार्यान्वित करण्‍याचे काम शनिवार, २८ मार्च २०२६ रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते रविवारी २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्‍यान एकूण १६ तास हाती घेण्‍यात येणार आहे. या कार्यवाही दरम्‍यान ‘एच पश्चिम’ विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा रविवारी, २९ मार्च २०२६ रोजी बंद राहणार आहे. तर, काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

या दुरुस्तीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ दिवस पाणी उकळून - गाळून प्‍यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा परिसर

 

संपूर्ण खार पश्चिम, संपूर्ण सांताक्रुझ पश्चिम व वांद्रे पश्चिम येथील काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.०० ते सकाळी ८.३० वा.)

संपूर्ण बाजार मार्ग, जैन मंदीर मार्ग परिसर डि’मोंटे रस्ता परिसर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.०० ते सकाळी ८.३० वा.)

वांद्रे पश्चिमेकडील हिलरोड, पेरीरोड, मॅन्युअल गोन्साल्विस रोड, सेंट अँड्रयूज रोड, सेंट पॉल रोड, डॉमनिक रोड, आर. के. पाटकर रस्ता, न्यू आणि ओल्ड कांतवाडी, रणवार गाव, वरोडा मार्ग, कार्टर रोड, पालीमाला मार्ग, चिंबई गाव, शेर्ली गाव, राजनगाव, मालागाव आणि पालीगाव (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वा.)

खारदांडा कोळीवाडा, दांडपाडा, च्युइम गावठाण, गझदरबंद झोपडपट्टीचा काही भाग, खार पश्चिमेकडील काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ५.३० ते रात्री १०.०० वा.)

डॉ. आंबेडकर मार्गालगतचा परिसर, पाली गावठाण,पाली पठार, वांद्रे व खार पश्चिमेचा काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ रात्री १०.०० ते मध्यरात्री १.०० वा.)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >