Plane - Fire Truck Accident : थेट विमानानेच दिली अग्निशमन दलाच्या गाडीला धडक, अनेक जण जखमी

न्यूयॉर्कच्या ला गार्डिया विमानतळ (LaGuardia Airport) येथे सोमवारी (२३ मार्च) एक धक्कादायक अपघात घडला. लँडिंगदरम्यान एका विमानाची जमिनीवरील वाहनाशी धडक झाली, ज्यामुळे विमानतळावरील कामकाजात मोठा अडथळा निर्माण झाला.


फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइटनुसार, एअर कॅनडा एक्प्रेसचे CRJ-900 हे विमान मॉन्ट्रियलहून न्यूयॉर्कला येत असताना रनवे ४ वर लँडिंगदरम्यान अग्निशमन दलाच्या ट्रकला धडकले.


या घटनेनंतर फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (FAA) तातडीने विमानतळावरील सर्व उड्डाणांवर बंदी (ग्राउंड स्टॉप) लागू केली. यामुळे अनेक फ्लाइट्स उशिरा किंवा रद्द झाल्या.


अपघातात पाच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. काही जणांची प्रकृती गंभीर असून, मृत्यू झाल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.





घटनेनंतर आपत्कालीन पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर इराणकडून २० लाख डॉलर्स शुल्क

तेहरान : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेले संकट अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. आता इराणने जागतिक तेल पुरवठ्यासाठी

पश्चिम आशियातील युद्धामुळे पाकिस्तान भिकेला; एका रात्रीत इंधनाचे भाव २०० रुपयांनी वाढले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान सरकारने आता हाय-ऑक्टेन इंधनावरील करात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला

Iran-US-Israel War : "अमेरिकेने ऊर्जा केंद्रांवर हल्ला केल्यास..."; अमेरिकेच्या धमकीला इराणचे स्पष्ट उत्तर

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव आता अत्यंत गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू

Iran-US-Israel War : इराणचा इस्रायलवर मोठा मिसाइल हल्ला; ३०० हून अधिक जखमी

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज २४वा दिवस आहे. अशातच इराणने रविवारी सकाळी इस्रायलवर

ब्रिटनची ‘एचएमएस अन्सन’ अणु-पाणबुडी अरबी समुद्रात तैनात

लंडन : मध्य पूर्वेकडे सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षाच्या तिसऱ्या आठवड्यात ब्रिटनने ब्रिटिश रॉयल

अमेरिकेचे एफ-15 लढाऊ विमान पाडल्याचा इराणचा दावा

तेहरान : इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचला आहे. इराणने दावा केला आहे की