Monday, March 23, 2026

पश्चिम आशियातील युद्धामुळे पाकिस्तान भिकेला; एका रात्रीत इंधनाचे भाव २०० रुपयांनी वाढले

पश्चिम आशियातील युद्धामुळे पाकिस्तान भिकेला; एका रात्रीत इंधनाचे भाव २०० रुपयांनी वाढले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान सरकारने आता हाय-ऑक्टेन इंधनावरील करात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कर प्रति लिटर १०० पाकिस्तानी रुपयांवरून थेट ३०० रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत इंधन दरवाढ आणि आर्थिक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. उच्च-ऑक्टेन इंधनावरील करवाढ प्रामुख्याने आलिशान वाहनांवर परिणाम करणार असून, सार्वजनिक वाहतूक आणि विमान प्रवासाच्या दरांवर थेट परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, यापूर्वी ६ मार्च रोजी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ५५ रुपयांची वाढ केली होती. पश्चिम आशियात सुरु असलेल्या युद्धामुळे आणि जागतिक तेलदरवाढ यामुळे पाकिस्तानातील देशांतर्गत खर्चावर ताण वाढला आहे.

त्यामुळे नवीन दरांनुसार आता पेट्रोलची किंमत २६६.१७ रुपयांवरून ३२१.१७ रुपये प्रति लिटर झाली असून, डिझेलचा दर २८०.८६ रुपयांवरून ३३५.८६ रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचला आहे.

जेट इंधनाच्या दरवाढीचा परिणाम विमान प्रवासावरही दिसून आला आहे. देशांतर्गत विमान भाड्यात सुमारे २,८०० रुपयांची वाढ झाली असून, कराची-लाहोर-इस्लामाबाद मार्गांवर तिकीट दर ५,००० रुपयांपर्यंत गेले आहेत.

आंतरराष्ट्रीय प्रवासातही मोठी वाढ झाली असून, भाडे सुमारे १०,००० रुपयांनी वाढून २८,००० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. विशेषतः मध्य-पूर्व आणि मध्य आशियाई देशांसाठीच्या उड्डाणांमध्ये तब्बल १५,००० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा