Monday, March 23, 2026

काळा सोमवार, आठवड्याची सुरुवात मोठ्या घसरणीने

काळा सोमवार, आठवड्याची सुरुवात मोठ्या घसरणीने

मुंबई : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण विरोधात २८ फेब्रुवारी २०२६ पासून युद्ध सुरू केले आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या या युद्धाचा आजचा २४ वा दिवस आहे. हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता वाढली आहे. याचा शेअर बाजावार दिसला. आठवड्याची सुरुवात मोठ्या घसरणीने झाली. शेअर बाजार जोरात आपटल्यामुळे गुंतवणुकदारांचा आजचा सोमवार हा काळ सोमवार ठरला.

बीएसई सेन्सेक्स मागच्या आठवड्यात ७४,५३२.९६ वर बंद झाला होता. आज सेन्सेक्स १०.२१ वाजता ७२,७५१.१६ पर्यंत घसरला. बाजारात १७८१.८० अंकांची घसरण झाली. बाजार २.३९ टक्क्यांनी घसरला. निफ्टी फिफ्टी मागच्या आठवड्यात २३,११४.५० वर बंद झाला होता. आज निफ्टी फिफ्टी १०.२३ वाजता २२,५४०.५५ पर्यंत घसरला. निफ्टीत ५७३.९५ अंकांची अर्थात २.४८ टक्क्यांची घसरण झाली.

२४ कॅरेट शुद्ध एक तोळा (१० ग्रॅम) सोनं : १,४५,९६० रुपये २२ कॅरेट शुद्ध एक तोळा (१० ग्रॅम) सोनं : १,३३,७९० रुपये एक किलो चांदी : २,३०,००० रुपये कच्चे तेल : १०७.८६ यूएस डॉलर पेट्रोल (प्रति लिटर) : १०३.५४ रुपये डिझेल (प्रति लिटर) : ९०.०३ रुपये एलपीजी (१४.२ किलो) : ९१२.५० रुपये सीएनजी (प्रति किलो) : ७७ रुपये पीएनजी (प्रति घन मीटर) : ५० रुपये एक अमेरिकन डॉलर : ९३.९० रुपये

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >