अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधर 2 सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातली आहे. धुरंधरनं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत इतिहास रचला आहे. एकीकडे रणवीरच्या धुरंधरच सर्वत्र भरभरून कौतुक होत असताना मात्र, दुसरीकडे दीपिका पदुकोण सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होत आहे.
रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री दीपिका पदुकोण धुरंधर सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगला उपस्थित नव्हती तसेच, तिने पती रणवीर सिंहचं किंवा सिनेमाचं देखील कौतुक केलेलं नाही. दीपिकानं सोशल मिडियावर धुरंधरसाठी किंवा रणवीरसाठी कोणतीही पोस्ट शेअर केलेली नसून दीपिकाची ही गोष्ट सध्या चाहत्यांना खटकत आहे. सोशल मिडियावर अनेकजण दीपिकावर जोरदार टीका करत आहेत.
स्क्रीनिंग मिस केल्यानंतर नुकताच दीपिका आपल्या सासरच्या मंडळींसोबत एका कॉन्सर्टमध्ये दिसली. तिचे कॉन्सर्टमधील अनेक व्हिडिओ आणि फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून 'ती नवऱ्याच्या सिनेमासाठी वेळ न काढता कॉन्सर्टला गेली', असं म्हणत अनेकजण दीपिकावर टीका करत आहेत.
रणवीर सिंहचा धुरंधर सिनेमा जगभरात धूमाकूळ घालत आहे. जगभरातून प्रत्येकजण रणवीरचं कौतुक करत आहे. मात्र, रणवीरची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोणनं रणवीरचं कौतुक का केलं नाही ? असा प्रश्न चाहत्यांना पडला असून याबाबत सोशल मिडियावर चाहत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.






