Sunday, March 22, 2026

हॅरियर.इव्हीचे नवीन फिअरलेस+ क्यूडब्ल्यूडी ७५ मॉडेल

हॅरियर.इव्हीचे नवीन फिअरलेस+ क्यूडब्ल्यूडी ७५ मॉडेल

मुंबई : टाटा.इव्ही, भारतातील सर्वात मोठी फोर-व्हीलर इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी, यांनी हॅरियर.इव्ही या संपूर्ण स्वदेशी आणि दमदार एसयूव्हीसाठी नवी ‘फिअरलेस+ क्यूडब्ल्यूडी ७५’ पर्सोना सादर केली. या लॉन्चमुळे जाणकार ग्राहकांना आता हॅरियर.इव्हीचा सुपरकारसदृश बेजोड परफॉर्मन्स अनुभवता येणार असून, ड्युअल मोटर क्वाड-व्हील ड्राइव्ह तंत्रज्ञानामुळे उत्कृष्ट ऑफ-रोड क्षमता देखील मिळणार आहे. विशेष म्हणजे, ही प्रगत वैशिष्ट्ये असलेली पर्सोना २६.४९ लाख रुपये (एक्स-शोरूम) या किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

एक्टि.इव्ही+ या ईव्ही आर्किटेक्चरवर विकसित केलेली हॅरियर.इव्ही ‘फिअरलेस+ क्यूडब्ल्यूडी ७५’ प्रभावी ५०४ एनएम टॉर्क निर्माण करते आणि केवळ ६.३ सेकंदांत ० ते १०० किमी/ताशी वेग गाठण्याची क्षमता दर्शवते. त्यामुळे विविध ड्रायव्हिंग परिस्थितींमध्ये झपाट्याने गती आणि अचूक नियंत्रण यांचा उत्कृष्ट समतोल साधता येतो. या मॉडेलमध्ये सहा टेरेन मोड्ससह ऑफ-रोड असिस्ट आणि बूस्ट मोडचा समावेश असून, ड्युअल-मोटर क्वाड-व्हील ड्राइव्ह सिस्टममुळे ट्रॅक्शन आणि स्थिरता अधिक सक्षम होते. परिणामी, विविध भू-प्रदेश आणि प्रत्यक्ष रस्त्यांच्या परिस्थितींमध्ये ही एसयूव्ही आत्मविश्वासपूर्ण आणि दमदार कामगिरी करते.

‘फिअरलेस+ क्यूडब्ल्यूडी ७५’ ही पर्सोना आरामदायकता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा उत्कृष्ट संगम सादर करते. यात मेमरी फंक्शनसह ६-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट, ४-वे पॉवर्ड को-ड्रायव्हर सीट तसेच फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्सचा समावेश आहे. याशिवाय, ३६०-डिग्री कॅमेरा, जेबीएल ब्लॅक १०-स्पीकर ऑडिओ सिस्टम, आर१९ अलॉय व्हील्स आणि व्हॉईस-असिस्टेड ड्युअल-झोन पूर्णतः ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल यांसारखी प्रगत फीचर्स देण्यात आली आहेत. अॅम्बियंट लायटिंग, रियर-रो कम्फर्ट हेडरेस्ट आणि रियर विंडो सनशेड्समुळे दैनंदिन प्रवास अधिक आरामदायी आणि संतुलित अनुभव देतो. ग्राहकांच्या संपूर्ण मनःशांतीसाठी हॅरियर.इव्ही ‘फिअरलेस+ क्यूडब्ल्यूडी ७५’ मध्ये आजीवन बॅटरी वॉरंटी देण्यात आली आहे, ज्यामुळे मालकीचा अनुभव अधिक सुलभ आणि विश्वासार्ह ठरतो. याला मिळालेले ५-स्टार भारत-एनसीएपी प्रमाणपत्र हे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत टाटा मोटर्सच्या ठाम वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

क्वाड-व्हील ड्राइव्ह तंत्रज्ञान अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याबाबत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे चीफ कमर्शियल ऑफिसर श्री. विवेक श्रीवत्स म्हणाले, “हॅरियर.इव्हीला ग्राहकांकडून मिळालेला प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे. अवघ्या सहा महिन्यांत १३,००० हून अधिक गाड्यांची डिलिव्हरी करण्यात आली असून, या वाहनाने देशभरात १०० दशलक्ष किलोमीटरहून अधिक अंतर पार केले आहे. ग्राहकांनी ‘कुठेही जाण्याची’ क्षमता प्रत्यक्षात अनुभवली आहे. परफॉर्मन्स एसयूव्ही अधिक आकर्षक आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्याचा आमचा प्रयत्न या यशातून दिसून येतो. ‘फिअरलेस’ पर्सोनामध्ये ड्युअल-मोटर क्वाड-व्हील ड्राइव्ह तंत्रज्ञान समाविष्ट करून आम्ही ही सहजप्राप्यता आणखी पुढे नेत आहोत आणि अधिकाधिक ग्राहकांना ‘डिलीट-इम्पॉसिबल’चा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित करत आहोत.”

हॅरियर.इव्ही आता ७ पर्सोना पर्यायांमध्ये उपलब्ध असून, त्यांच्या किंमती (सर्व किंमती एक्स-शोरूम, संपूर्ण भारतात लागू) पुढीलप्रमाणे आहेत: ऍडव्हेंचर ६५ ची किंमत २१.४९ लाख रुपये आहे, तर ऍडव्हेंचर एस ६५ २१.९९ लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे. फिअरलेस + ६५ ची किंमत ₹२३.९९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे आणि फिअरलेस + ७५ व्हेरिएंट २४.९९ लाख रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय आणखी एक फिअरलेस + ७५ व्हेरिएंट २६.४९ लाख रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. टॉप लाईनमध्ये एम्पॉवर्ड ७५ ची किंमत २७.४९ लाख रुपये असून, त्याचे आणखी एक व्हेरिएंट २८.९९ लाख रुपयांमध्ये सादर करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा