नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारचे नेतृत्व करत सार्वजनिक पदावर दीर्घकाळ काम करण्याचा नवा विक्रम केला आहे. त्यांनी सलग ८९३१ दिवस सार्वजनिक पदावर राहून सरकारचे नेतृत्व केले आहे आणि करत आहेत. याआधी सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांनी ८९३० सार्वजनिक पदावर राहून सरकारचे नेतृत्व करण्याचा विक्रम केला होता.
A milestone rooted in service, hard work and unwavering commitment. Today, PM @narendramodi Ji surpasses the 8,930-day record of former Sikkim CM Pawan Kumar Chamling, becoming the longest-serving head of a government in India. PM Modi Ji's 8,931 days in public life, first as…
— Amit Shah (@AmitShah) March 22, 2026
नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून ७ ऑक्टोबर २००१ रोजी पहिल्यांदा पदभार हाती घेतला आणि मे २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. नंतर २६ मे २०१४ रोजी त्यांनी देशाचे १४ वे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला, तेव्हापासून ते देशाचे नेतृत्व करत आहेत. मोदींनी ७ ऑक्टोबर २००१ पासून आतापर्यंत ८९३१ दिवस सार्वजनिक पदावर राहून सरकारचे नेतृत्व केले आहे आणि करत आहेत.
मागील काही वर्षांत पंतप्रधान मोदींनी अनेक राजकीय मापदंड प्रस्थापित केले आहेत. ते गुजरातचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि राज्याचे नेतृत्व करण्याचा सर्वाधिक व्यापक अनुभव असलेले पंतप्रधान आहेत. स्वातंत्र्यानंतर जन्मलेले ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.
Prime Minister Shri @narendramodi is now the longest-serving head of a government in India. Pure devotion to the nation and its people defines PM Modi Ji. From his unwavering commitment as the Chief Minister of Gujarat to his dedicated leadership as the Prime Minister, his life… pic.twitter.com/llGPwziZZC
— Rajnath Singh (@rajnathsingh) March 22, 2026
मोदींचा कार्यकाळ सततच्या निवडणुकीतील यशाने गाजला आहे. पंतप्रधान मोदींनी भारतीय जनता पक्षाला २०१४, २०१९ आणि २०२४ च्या सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिला आणि दोन पूर्ण कार्यकाळ पूर्ण करून तिसऱ्यांदा परतणारे ते पहिले बिगर-काँग्रेसी पंतप्रधान आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यूट्यूबवर ३० दशलक्ष सबस्क्रायबर आहेत. यूट्युबवर सर्वाधिक सबस्क्रायबर असलेल्या नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी जगात अव्वलस्थानी आहे. पंतप्रधान मोदींचे इन्स्टाग्रामवरील फॉलोअर १० कोटींपेक्षा जास्त आहेत. तसेच पंतप्रधान मोदींचे एक्स अर्थात ट्विटरवरील फॉलोअर १० कोटी सहा लाखांपेक्षा जास्त आहेत. लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असलेल्या नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी जगात अव्वलस्थानी आहेत.






