उन्हाळी सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : उन्हाळ्यातील सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर आणि पुणे – नागपूर या मार्गांवर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर विशेष गाडीच्या दोन फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. गाडी क्रमांक ०१०२१ ही विशेष गाडी ३ एप्रिल २०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १२:५५ वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी ३:४५ वाजता नागपूर येथे पोहोचेल.परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१०२२ ही विशेष गाडी ३ एप्रिल २०२६ रोजी नागपूर येथून रात्री ८ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या विशेष गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबे देण्यात येणार आहेत.


गाडीची रचना एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, सहा वातानुकूलित तृतीय श्रेणी, नऊ शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि एक सामान्य द्वितीय श्रेणी-सह-गार्ड ब्रेक व्हॅन अशी असेल. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Minister Nitesh Rane : महाराष्ट्र सागरी व भूजलशाही मच्छीमार कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेबाबत मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई: महाराष्ट्र सागरी व भूजलशाही मच्छीमार कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेसंदर्भात मंत्रालयात

Nitesh Rane: ससून डॉक आणि मरोळ मच्छीमार मार्केटच्या विकासकामांचा नितेश राणेंकडून आढावा

मुंबई: मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुंबईतील ससून डॉक आणि मरोळ मच्छीमार मार्केटच्या

Devendra Fadnavis : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २२ हजार ४२५ कोटींचा विकास आराखडा

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची मंजुरी; केंद्रीय पर्यटन मंत्र्यांची लोकसभेत माहिती मुंबई :

Country's First Travelator Skywalk in Mumbai : महालक्ष्मी येथे मेट्रो, मोनो आणि रेल्वे होणार एकत्र, प्रवाशांचा वेळ वाचणार

मुंबई: मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत एका ऐतिहासिक आणि क्रांतिकारी प्रकल्पाची भर पडत आहे. एमएमआरडीतर्फे (MMRDA)

Nitin Gadkari : 'इथेनॉल'च्या ट्रोलिंगबाबत नितीन गडकरींनी दिवाणी खटला दाखल करावा

मुंबई उच्च न्यायालय; पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा निर्णय पेट्रोलियम मंत्रालयाच्या अखत्यारित मुंबई :

Archaeology Department on Gopalgad : शिवरायांचा ‘गोपाळगड’ खासगी विळख्यातून मुक्त होणार; पुरातत्त्व विभागाकडून भूसंपादन प्रक्रिया सुरू

२२० रुपयांच्या बोलीवर झाला होता लिलाव https://prahaar.in/2026/07/27/rain-god-blesses-the-kharif-season-what-are-the-dam-water-levels-in-nashik-and-other-divisions/ मुंबई : गुहागर