Sunday, March 22, 2026

MHADA Lottery: मुंबईसह ठाण्यात बंपर लॉटरी, पाच हजार घरांची लॉटरी कोणत्या प्राईम लोकेशनवर?

MHADA Lottery: मुंबईसह ठाण्यात बंपर लॉटरी, पाच हजार घरांची लॉटरी कोणत्या प्राईम लोकेशनवर?

मुंबई: मुंबई-ठाणे या शहरात हक्काचे घर घेणे सामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे मात्र याच शहरात तुमचं घर होणारं. म्हाडाकडून तब्बल पाच हजार घरांसाठी काही दिवसांत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. यात नक्की मुंबई आणि ठाणे किती घरांचा समावेश असेल आणि कोणत्या प्राईम लोकेशनवर असतील याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

म्हाडा दर वेळी सर्वसामान्यांचे हक्काच्या घरांच स्वप्न पूर्ण करतो. आताही ही संधी मिळणार आहे. त्यासाठी म्हाडा मुंबईतील २८०० ते ३००० घरांच्या विक्रीसाठी मार्चच्या शेवटच्या आठड्यात किंवा एप्रिल सुरुवातीस जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या तयारीत आहे.यासाठी मुंबई मंडळाकडून सध्या घरांची जमवाजमव तसेच किंमती निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. यातील घरांच्या किंमती ठरल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल.

म्हाडाच्या लॉटरीमध्ये अॅडव्हान्स कॉन्ट्रिब्युशन स्कीम अंतर्गत येणाऱ्या घरांसह पवई, घाटकोप तसेच प्रतीक्षा नगरमधील विखुरलेल्या ६४ घरांचा तसेच मुंबई इमारत दुरुस्ती तसेच पुनर्रचना मंडळाकडून मिळालेल्या १४३ घरांचाही समावेश असणार आहे. ही घरं लोअर परळ, वडाळा आणि माझगाव या प्राईम लोकेशनवर असणार आहेत.

मुंबई शहरापाठोपाठ आता म्हाडाच्या कोकणविभागानेही घरांसाठी लॉटरी काढण्याची तयारी सुरु केलेली आहे. यात लॉटरीसाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून घरांची जमवाजमव तसेच किंमती निश्चित करण्यासाठी सुरुवात होईल. तर एप्रिलच्या शेवटापर्यंत सुमारे दोन हजार घरांची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन समोर आले आहे.

यात मानपाडा, चितळसर आणि बाळकूम अशा विविध ठिकाणांवरील घरांसह २० टक्के योजनेतील घरांचा समावेशी असणार आहे, अशी सर्व माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ.विशाल राठोड यांनी सांगितली आहे.

Comments
Add Comment