उन्हाळा येताच लिंबू महागले

मुंबई : उन्हाळा येताच किरकोळ बाजारात लिंबू महागले आहे. सध्या किरकोळ बाजारात आकारमानानुसार लिंबू प्रति नग १०, १२, १५ रुपये दराने विकले जात आहे. अन्नाची लज्जत वाढवणारे, पचनक्रिया सुधारण्यास मदत करणारे, शरीराची क जीवनसत्त्वाची (व्हिटॅमिन सी) गरज भागवणारे, उन्हाळ्यात सरबताच्या रुपात तहान भागविणारे लिंबू महागले आहे. यामुळे एरवी बाजारात आल्यास हमखास लिंबू खरेदी करणारे ग्राहक आता हात आखडता घेऊ लागले आहेत.


महाराष्ट्रात प्रामुख्याने अहिल्यानगरमधील श्रीगोंदे तसेच सोलापूर, जळगाव, बुलढाणा आणि अकोल्याच्या काही भागांतून मोठ्या प्रमाणात लिंबांचा पुरवठा होतो. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधूनही राज्यात लिंबाची आवक होते. पण राज्यातले लिंबाचे आगार म्हणून श्रीगोंद्याचीच ओळख आहे. मात्र सध्या लिंबाच्या व्यापारावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.


उत्पादकांकडून दलाल प्रतिकिलो ८० ते ८५ रुपये दराने लिंबाची खरेदी करत आहेत. एका किलोत साधारण २५ ते ३० लिंब दलाल घेत आहेत. हे दलाल मुंबई - पुण्यातील घाऊक व्यापाऱ्यांना प्रतिकिलो १५० रुपये दराने लिंबांची विक्री करत आहेत. घाऊक व्यापाऱ्यांकडून किरकोळ व्यापारी लिंब खरेदी करून ती ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहेत. उत्पादक, दलाल, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी ते ग्राहक अशी ही साखळी आहे. या साखळीत दलालापासून ते किरकोळ व्यापाऱ्यापर्यंतचे सगळे नफा कमावत आहेत. यामुळेच ग्राहकाला लिंबू दहा ते पंधरा रुपये प्रति नग या दराने उपलब्ध आहे. एरवी दहा रुपयांत किमान दोन ते तीन लिंबू उपलब्ध असतात. पण सध्या दहा ते पंधरा रुपयांत एक मध्यम आकाराचे लिंबू मिळत आहे.

Comments
Add Comment

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी; मुख्यमंत्र्यांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्याचा संकल्प करण्याचे आवाहन

पुणे: राज्यातील विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात

दातृत्वाचा धनी हरपला! दत्ता मेघे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने दातृत्वाचा धनी हरपला आहे. शिक्षण संस्थांचे जाळे

ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन

नागपूर : विदर्भातील ज्येष्ठ राजकारणी, शिक्षणतज्ज्ञ व समाजसेवक तथा राज्याचे माजी मंत्री दत्ता मेघे यांचे रविवारी

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'

अटीतटीच्या लढतीत सोलापूरच्या 'बाहुबली'चा ४-३ ने पराभव पुणे : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने आपल्या अनुभवाच्या

ब्रिटनची ‘एचएमएस अन्सन’ अणु-पाणबुडी अरबी समुद्रात तैनात

लंडन : मध्य पूर्वेकडे सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षाच्या तिसऱ्या आठवड्यात ब्रिटनने ब्रिटिश रॉयल

प्रतिकूल हवामानामुळे देशातले काजू उत्पादन ६० टक्के घटणार ?

नवी दिल्ली : प्रतिकूल हवामानामुळे देशातले काजू उत्पादन ६० टक्के घटण्याची भीती व्यक्त होत आहे. शाला कच्च्या