Saturday, March 21, 2026

छत्रपती शिवाजी महाराज सिनेमात झळकणार धुरंधर २ मधील 'हा' अभिनेता

छत्रपती शिवाजी महाराज सिनेमात झळकणार धुरंधर २ मधील 'हा' अभिनेता

भारतीय सिनेमात सध्या ऐतिहासिक सिनेमांचा ट्रेंड सुरु असून लवकरच 'द प्राइड ऑफ भारत : छत्रपती शिवाजी महाराज' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असणार आहे. या सिनेमात धुरंधरमधील अभिनेता भूमिका साकारणार असल्याची जोरदार चर्चा होत असून प्रेक्षकांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

'द प्राइड ऑफ भारत : छत्रपती शिवाजी महाराज' या सिनेमाचं दिग्दर्शन संदीप सिंह करत असून या सिनेमात अभिनेता ऋषभ शेट्टी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर, अभिनेता अर्जून रामपाल या सिनेमात व्हिलनच्या भूमिकेत झळकणार आहे. तसेच, या सिनेमात शेफाली शाह राजमाता जिजाबाई यांची भूमिका साकारणार आहे. तसेच, लवकरच २०२६ मध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरु होणार आहे.

नुकताच अभिनेता अर्जून रामपालनं धुरंधर सिनेमात आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर आता लवकरच अर्जून रामपाल या नवीन सिनेमात एक आगळीवेगळी भूमिका साकारणार आहे. त्यामुळे आता 'द प्राइड ऑफ भारत : छत्रपती शिवाजी महाराज' या सिनेमात अर्जून रामपालचा दमदार अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Comments
Add Comment