Saturday, March 21, 2026

पाकड्यांना पाठवली ईदी, लष्कर-ए-तोयबाचा कमांडर बिलाल आरिफ सलाफी ठार

पाकड्यांना पाठवली ईदी, लष्कर-ए-तोयबाचा कमांडर बिलाल आरिफ सलाफी ठार

मुरीदके : पाकिस्तानला अज्ञातांनी ईदी पाठवली आहे. पाकिस्तानमधील मुरीदके येथील लश्कर-ए-तोयबा (LeT) या दहशतवादी संघटनेच्या मुख्यालयात, मरकज तैबामध्ये, स्वयंघोषीत कमांडर बिलाल आरिफ सलाफीची हत्या करण्यात आली . हा हल्ला २१ मार्च रोजी, ईद-उल-फित्रचा नमाज संपल्यानंतर लगेचच झाला. अज्ञात हल्लेखोरांनी आधी जवळून गोळीबार केला नंतर चाकूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बिलाल आरिफ सलाफीचा थोड्याच वेळात मृत्यू झाला.

बिलाल आरिफ सलाफीवर जवळून हल्ला झाला आणि मरकज तैबामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या गोंधळाचा फायदा घेत हल्लेखोर पळून गेले. हल्ल्यानंतरची परिस्थिती दाखवणारे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. एका व्हिडीओत दहशतवादी बिलाल आरिफ सलाफी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसत आहे. भोवताली असलेली लोकं गोंधळल्याचेही दिसत आहे. व्हिडीओची सत्यता अद्याप पडताळण्यात आलेली नाही. पण पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर बिलाल आरिफ सलाफी ठार झाल्याची बातमी झपाट्याने पसरत आहे.

Comments
Add Comment