Friday, March 20, 2026

Stormy weather : वादळी हवामानाचा अनेक उड्डाणांवर परिणाम; एअरलाइनकडून प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ऍडव्हायझरी जारी

Stormy weather : वादळी हवामानाचा अनेक उड्डाणांवर परिणाम; एअरलाइनकडून प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ऍडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख शहरे दिल्ली आणि बंगळुरू येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम हवाई सेवांवरही होऊ शकतो.यामुळे इंडिगो, एअर इंडिया आणि स्पाइसजेट यांनी प्रवाशांसाठी ट्रॅव्हल अॅडव्हायझरी जारी करत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

इंडिगोने आपल्या प्रवाशांना सावध करत सांगितले आहे की खराब हवामानामुळे विमानांच्या आगमन आणि प्रस्थानात किरकोळ विलंब होऊ शकतो. एअरलाइनने म्हटले आहे की परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांच्या टीम्स आधीपासून सज्ज आहेत, मात्र हवामानाच्या परिणामामुळे उड्डाण संचालनाचा वेग काहीसा मंदावू शकतो. प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी आपल्या फ्लाइटचा स्टेटस नक्की तपासावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

तर एअर इंडियाने माहिती दिली आहे की दिल्ली आणि उत्तर भारतातील काही भागांत सतत पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा अंदाज आहे, ज्यामुळे दिल्लीहून येणाऱ्या-जाणाऱ्या उड्डाणांवर परिणाम होऊ शकतो. एअरलाइनने प्रवाशांना विनंती केली आहे की विमानतळासाठी निघण्यापूर्वी फ्लाइटची स्थिती तपासावी आणि संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन अतिरिक्त वेळ ठेवून घरातून निघावे.

दरम्यान, स्पाइसजेटने कळवले आहे की लेह येथे खराब हवामानामुळे सर्व आगमन आणि प्रस्थान उड्डाणे प्रभावित होऊ शकतात. त्यामुळे संबंधित कनेक्टिंग फ्लाइट्सवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी आपल्या फ्लाइटची स्थिती सतत तपासत राहावी, असा सल्ला एअरलाइनकडून देण्यात आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >