विक्रम गोखले यांच्या शेवटच्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

- निधनाच्या ३ महिन्यांनंतर विक्रम गोखले यांच्या अंतिम सिनेमाचे पोस्टर रिलीज


मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते, दिवंगत विक्रम गोखले यांचा अखेरचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अतिशय हृदयस्पर्शी कथा असलेला 'बेवारस' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या सिनेमाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे.


या सिनेमात विक्रम गोखलेंसह तेजस्विनी पंडित, रोहिणी हट्टंगडी, उषा नाईक, निहार गिते, ऋतुजा बागवे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी, श्रीजित मराठे, आदित्य देशमुख यांच्या मुख्य भूमिका आहेत. डोळे भरून आलेल्या विक्रम गोखले यांनी एका लहान मुलाला मिठी मारल्याचं चित्र पोस्टरवर असून पोस्टरप्रमाणेच सिनेमाची कथा देखील अत्यंत हृदयस्पर्शी आहे.


या सिनेमात विक्रम गोखले यांनी अनाथालय चालवणाऱ्या तत्त्वनिष्ठ आबाजींची भूमिका साकारली आहे. विक्रम गोखलेंची अखेरची कलाकृती असलेल्या या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये आता उत्सुकता निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. पण पोस्टरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


सिनेमाची रिलीज डेट लवकरच जाहीर केली जाणार आहे. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी विक्रम गोखले यांचं निधन झालं. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


आता त्यांच्या हा शेवटचा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड प्रमाणात उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

Arjun Rampal : ८ वर्षांच्या सहवासानंतर अखेर जोडले बंध; अभिनेता अर्जुन रामपालने गोव्यात गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत उरकले लग्न!

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची दीर्घकाळाची जोडीदार गॅब्रिएला डेमेट्रियाडेस यांनी अखेर अधिकृतपणे

Taapsee Pannu : तापसी पन्नूच्या 'गांधारी' चित्रपटाची पहिली झलक समोर; टीझरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट 'गांधारी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन

Sandeep Vanga vs Deepika Padukone : दीपिका पादुकोणमुळे ‘स्पिरीट’ची कथा फुटली ? ५-६ कोटींचा वाद अन् १०% चा वाटा; वांगा बंधूंचा दीपिका पादुकोणवर सनसनाटी आरोप

मुंबई : दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांच्या आगामी ‘स्पिरीट’ (Spirit Movie) या बहुचर्चित चित्रपटाभोवतीचा वाद

Vanita Kharat : सावध राहा! ऑनलाईन पार्सलच्या जाळ्यात अडकली वनिता खरात; अभिनेत्रीनेच उघड केली भामट्यांची नवी शक्कल!

मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातसोबत पार्सलच्या नावाने ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार

Akshaye Khanna : धुरंधरचा 'रहमान डकैत' आता गुरु शुक्राचार्यांच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना त्याच्या नवनवीन आणि आव्हानात्मक भूमिकांसाठी चर्चेत आला. 'छावा'मधील 'औरंगजेब'

Sonu Nigam : "ते १२ रुपये फ्रेम करून मी आजही माझ्या ऑफिसमध्ये लावले आहेत", सोनू निगमने सांगितला जबरदस्त किस्सा

मुंबई : अनेक कलाकार बरेचदा आपल्या चाहत्यांचं प्रेम जाणून घेण्यासाठी वेशांतर करुन त्यांच्यात वावरतात. २०१६ मध्ये