'कोकण रेल्वेच्या गाड्यांना दिवा ऐवजी दादरचाच थांबा द्यावा'

खेड : रत्नागिरी - दादर या पॅसेंजर गाडीला मागील काही महिन्यांपासून दादर ऐवजी दिवा हाच शेवटचा थांबा देण्यात आला आहे. यामुळे कोकणातून मुंबईत येणाऱ्या असंख्य प्रवाशांचे हाल होत आहेत. यावर उपाय म्हणून रत्नागिरी - दादर या पॅसेंजर गाडीला दादर येथे थांबा द्यावा, अशी मागणी भाजपच्या वैभव खेडेकर यांनी केली आहे. पॅसेंजर गाडीच्या बदललेल्या वेळा आणि दादर ऐवजी दिवा हाच शेवटचा थांबा देण्याचा निर्णय यामुळे कोकणवासियांची प्रचंड गैरसोय झाली आहे. प्रवाशांचे प्रश्न समजून घेऊन रेल्वेने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी खेडेकर यांनी केली.


मधु दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या दूरदृष्टीतून कोकणातील दुर्गम भागात रेल्वेचे स्वप्न साकार झाले. कठीण भौगोलिक परिस्थितीत उभारलेली ही रेल्वे कोकणवासीयांसाठी विकासाची नवी दिशा घेऊन आली. या प्रकल्पासाठी स्थानिकांनी आपल्या जमिनी अत्यल्प दरात दिल्या, ज्यामुळे हा ऐतिहासिक प्रकल्प शक्य झाला.


एकेकाळी केवळ ३५ रुपयांत कोकणातून मुंबईत पोहोचणे शक्य होते. कोकण रेल्वेच्या १९९४ साली सुरू झालेल्या खेड - दादर आणि रत्नागिरी - दादर या दोन्ही पॅसेंजर गाड्यांनी कोकणवासीयांसाठी मोठा दिलासा होती. मात्र, सध्या दादर स्थानकावरील कोकण रेल्वेचा थांबा काढण्यात आल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याऐवजी गोरखपूरकडे जाणाऱ्या गाड्यांना प्राधान्य दिल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून वस्तुस्थिती समजावून सांगणे आवश्यक असल्याचे खेडेकर म्हणाले.

Comments
Add Comment

China AI Robot Wolf Army : भविष्यात AI कुत्रे करणार ड्रोनचा सामना; भविष्यातील युद्धासाठी चीनची ‘रोबोट वुल्फ आर्मी’ सज्ज!

चीन वेगाने आधुनिक आणि मानवविरहित युद्धाच्या दिशेने पुढे जात आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालात उघड झाले आहे

Iran-US-Israel War : युद्ध संपलेले नाही,गरज पडल्यास युद्धात परतण्यास इस्त्रायल सज्ज - बेंजामिन नेतन्याहू

अमेरिका आणि इराण (Iran-US-Israel War) यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Shivendrasinhraje Bhonsle : मंत्रालयातील नवीन इमारतीच्या बांधकामाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला सविस्तर आढावा

मंत्रालय परिसरात उभारण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री

Saudi and Iran : शस्त्रसंधीनंतर सौदी आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये महत्त्वाची चर्चा

इराण, इस्रायल आणि अमेरिका (Iran-US-Israel War) यांच्यात पाकिस्तानमध्ये होणाऱ्या निर्णायक शांतता चर्चेपूर्वीच सौदी अरेबिया