Friday, March 20, 2026

अशोक खरातचे ५८ व्हिडीओ कसे समोर आले?, प्रकरणात नवा ट्विस्ट

अशोक खरातचे ५८ व्हिडीओ कसे समोर आले?, प्रकरणात नवा ट्विस्ट

नाशिक: राजकारण्यांना स्वप्न दाखवणाऱ्या तथाकथित ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपांवरून अटक करण्यात आली आहे. अशोक खरातच्या अटकेनंतर राजकीय कनेक्शन समोर आले. या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. स्वत:कडे देवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या भोंदू अशोक खरातचे अश्लील व्हिडीओ समोर आले होते. पण आता प्रकरणाने ट्विस्ट घेतला. २९ डिसेंबरचा फिर्यादी, १८ मार्च रोजी आरोपी झाला. मात्र, अशोक खरातचे ५८ व्हिडीओ समोर कसे आले? हा प्रश्न अनुत्तरीत राहिला होता. अशातच आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नीरज जाधव प्रकरणाचा मास्टर माइंड

अशोक खरातच्या मर्जीतील ऑफिस बॉय संशयित नीरज जाधव यानेच सगळा गेम केला, अशी माहिती समोर येत आहे. नीरज जाधव हा प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचं समजतंय. डिसेंबर २०२५ मध्ये नीरजनेच खरातच्या नकळत महिलांवरील कार्यालयातून ५८ बलात्काराचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. नीरज जाधव अशोकच्या ऑफिसमध्ये काम करत असताना त्याला अशोकच्या काळ्या करारनाम्याचा संशय आला. दुष्कृत्य करूनही खरात समाजात 'साधू' म्हणून वावरत असल्याचे पाहून नीरजच्या मनात पैशांची हाव निर्माण झाली.

खरातकडे पाच कोटी रुपयांची खंडणी

नीरज जाधवने खरातला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. नीरज आणि त्याच्या काही साथीदारांनी या वादग्रस्त क्लिप्सच्या बदल्यात खरातकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचीही माहिती समोर आली आहे. पण खरातने नीरजच्या धमक्यांना भाव दिला नाही. तुला काय करायचं ते कर.. असं म्हणत त्याने नीरजला फाट्यावर मारलं. त्यानंतर नीरजने पीडित महिलांची मदत घेण्याचा प्रयत्न केला अन् इथंच फास टाकला.

व्हिडीओ मेहुण्याला पाठविला अन् खरातची कोंडी

नीरजने शिर्डीतील एका २४ वर्षीय विवाहितेचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडीओ तिलाच व्हॉट्सअॅपवर पाठवून धमकावलं. या महिलेचं आणि खरातचं बोलणं झालं. नीरज धमकी देत असल्याचं पीडितेने खरातला कळविलं. परंतु, खरातने स्वतःला वाचविण्यासाठी तिला पोलिसात जाण्याचा मार्ग सुचवला. खरातकडून पैसे मिळण्याची शक्यता धूसर झाल्याने नीरजने सिडकोतील २८ वर्षीय विवाहितेचा व्हिडीओ तिच्या मेहुण्याला पाठविला अन् खरातची कोंडी झाली. मेहुण्याने या प्रकरणाकडे गांभिर्याने घेतलं अन् पिडितेला धीर देण्याचा प्रयत्न केला अन् पोलिसात फिर्याद फिर्यादीसाठी सांगितलं. पिडीतेने मेहुण्याचं म्हणणं ऐकलं अन् पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर भोंदू बाबाचा गेम ओव्हर झाला आहे.

अशोक खरातला अटक

दरम्यान, अशोक खरातविरुद्ध नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंगीकारक औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला असून, १८ मार्च रोजी पहाटे गुन्हे शाखेच्या पथकाने अशोक खरातला ताब्यात घेतलं होतं. आता त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment