मुंबई : अभिनेता रणवीर सिंहचा 'धुरंधर: द रिव्हेंज' पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात उत्सुक असल्याचे पहायला मिळत होते. १९ मार्च २०२६ रोजी 'धुरंधर २' सिनेमा प्रदर्शित झाला असून प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीपासूनच या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर २ मध्ये रणवीर सिंह, संजय दत्त, अर्जुन रामपाल, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांसारखे दिग्गज कलाकार आहेत.
धुरंधर २ सिनेमानं रिलीजनंतर बॉक्स ऑफिसवर चांगलाच धूमाकूळ घातला आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. पहिल्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा ओलांडणारा धुरंधर २ हा पहिला हिंदी सिनेमा ठरला आहे.
धुरंधर २ ने पेड प्रिव्ह्यूमध्ये प्रदर्शनापूर्वीच जोरदार कमाई केली असल्यामुळे त्याच्या दमदार ओपनिंगचे संकेत हा सिनेमा रिलीज होण्याआधीच मिळाले होते. या सिनेमाचे देशभरात ८,९०० हून अधिक शोज सुरू असून पहिल्या दिवशी ७५.०६ कोटींची कमाई करून, सिनेमाचे एकूण कलेक्शन ११८.०६ कोटींवर पोहोचले आहे. त्यामुळे या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे.






