सातारा जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा

सातारा : राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच सातारा जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, राज्यभरात दिसून आलेला भाजपचा करिश्मा आता सातारा जिल्ह्यातही स्पष्टपणे पाहायला मिळाला आहे. या निवडणुकीत भाजपचे संख्याबळ केवळ २८ सदस्यांपर्यंत मर्यादित असताना, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांच्या नेतृत्नात स्थानिक भाजपने केलेल्या प्रयत्नांना उल्लेखनीय यश मिळाले आणि भाजपच्या पाठिंब्यात वाढ झाली. जिल्हा परिषदेत ३३ सदस्यांचा पाठिंबा मिळवत भाजपने सत्ता मिळवली. विरोधकांना ३० मते मिळाली.


निर्णायक बहुमताच्या जोरावर भाजपच्या प्रिया शिंदे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी राजू भोसले यांना संधी मिळाली आहे. या विजयामुळे केवळ सत्ता परिवर्तन झाले नाही, तर साताऱ्यासारख्या पारंपरिक राजकीय बालेकिल्ल्यात भाजपाने आपली मजबूत पकड निर्माण केली आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॅबिनेट मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली घडलेली ही राजकीय खेळी सातारा जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण ठरली आहे. स्थानिक पातळीवरील सूक्ष्म नियोजन, प्रभावी संवाद आणि संघटन कौशल्य यामुळे भाजपला हा ऐतिहासिक विजय मिळवता आला. सातारा जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला असून, यामुळे आगामी काळात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच, या निकालामुळे राज्यातील राजकीय समीकरणांवरही दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

Iran-US-Israel War : युद्ध संपलेले नाही,गरज पडल्यास युद्धात परतण्यास इस्त्रायल सज्ज - बेंजामिन नेतन्याहू

अमेरिका आणि इराण (Iran-US-Israel War) यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Shivendrasinhraje Bhonsle : मंत्रालयातील नवीन इमारतीच्या बांधकामाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला सविस्तर आढावा

मंत्रालय परिसरात उभारण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री

Saudi and Iran : शस्त्रसंधीनंतर सौदी आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये महत्त्वाची चर्चा

इराण, इस्रायल आणि अमेरिका (Iran-US-Israel War) यांच्यात पाकिस्तानमध्ये होणाऱ्या निर्णायक शांतता चर्चेपूर्वीच सौदी अरेबिया

Intelligence Bureau : पालघरमध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'साठी हक्काची जागा

- महसूल विभागाचा मोठा निर्णय; वसईत कार्यालय आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा मुंबई : पालघर जिल्ह्याच्या