नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू चेइराओबा यांसारख्या विविध प्रादेशिक नववर्ष सणांच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी आणि कोंकणी भाषेत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी नवरात्रीच्या देखील शुभेच्छा दिल्या आहेत.
चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा देत सर्वांच्या आयुष्यात शिस्त, शांतता आणि सकारात्मक ऊर्जा नांदो, अशी पंतप्रधान मोदींनी प्रार्थना केली आहे.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! pic.twitter.com/yCgdAuXKgp
— Narendra Modi (@narendramodi) March 19, 2026
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी देवी दुर्गेची प्रार्थना करत तिचे आशीर्वाद सर्वांवर राहोत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद व करुणा वाढो, अशी भावना व्यक्त केली. “या पवित्र नवरात्री उत्सवानिमित्त मातेला प्रार्थना करतो की ती सर्वांवर आपले प्रेम आणि कृपा ठेवो,” असे त्यांनी म्हटले.
नवरात्रि के पहले दिन मां दुर्गा के प्रथम स्वरूप देवी शैलपुत्री की पूजा का विधान है। उनके आशीर्वाद से हर किसी के जीवन में संयम, शांति और सकारात्मक ऊर्जा का संचार हो, यही कामना है। वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम्। वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्॥ pic.twitter.com/jhjMB7SPY9
— Narendra Modi (@narendramodi) March 19, 2026
वेगवेगळ्या समुदायांसाठी स्वतंत्र संदेशांद्वारे पंतप्रधानांनी नववर्षाच्या शुभेच्छा देत सर्वांच्या आयुष्यात समृद्धी आणि यश लाभो, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच त्यांनी एक व्हिडिओ संदेशही शेअर करत सणासुदीच्या काळासाठी आपल्या शुभेच्छा आणि प्रार्थना व्यक्त केल्या.






