Wednesday, March 18, 2026

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच वाहने एकमेकांना धडकली असून अपघाताची तीव्रता मोठी होती.

पुण्यावरून मुंबईला जाताना नव्या सुरू झालेल्या बोगद्याच्या खोपोलीकडील एक्झिटवर हा अपघात झाला. यावेळी पाच वाहनांच्या धडकेत कंटेनर एका चारचाकीवर पलटल्यामुळे गाडीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सकाळी पुण्याहून मुंबईच्या दिशेने येताना ९.४०  च्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या वाहनांमध्ये अचानक ब्रेक लागल्याने मागून येणाऱ्या वाहनांनी एकमेकांना जोरदार धडक दिली. या साखळी अपघातात एक कंटेनर अनियंत्रित होऊन समोरच्या चारचाकी वाहनावर उलटला. त्यामुळे चारचाकीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा