West Bengal ED Raid : पश्चिम बंगालमध्ये ईडीअँक्शन मोडवर; एकूण १० ठिकाणी छापेमारी

- अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरण


पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी (१६ मार्च) मोठी कारवाई करत राज्यातील विविध भागांमध्ये छापेमारी केली. अवैध कॉल सेंटरच्या माध्यमातून लोकांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.


याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सिलीगुडी, हावडा, बिधाननगर आणि दुर्गापूर या भागांमध्ये सुमारे १० ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या प्रकरणात सुरश्री कर, सम्राट घोष आणि सुभजीत चक्रवर्ती यांची नावे समोर आली असून ईडीची पथके त्यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या ठिकाणांवरून महत्त्वाचे पुरावे गोळा करत आहेत. या आरोपींवर कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेक निरपराध लोकांना फसवून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळल्याचा आरोप आहे.


सध्या जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रे आणि साहित्याची तपासणी सुरू असून या संपूर्ण फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्न करत आहे.दरम्यान, या प्रकरणाचा कोणताही संबंध निवडणूक निधी किंवा राजकारणाशी आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. तपास यंत्रणा सर्व शक्यता लक्षात घेऊन प्रकरणाची चौकशी करत आहे.


ही कारवाई अशा वेळी झाली आहे, जेव्हा पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे वातावरण तापलेले आहे. निवडणूक आयोगाने नुकत्याच विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यात २३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी २ टप्प्यांत मतदान होणार असून ४ मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा

Delhi: हातात पुष्पगुच्छ घेऊन थेट शिरला विधानसभेत, अध्यक्षांच्या गाडीजवळ फुलांचा गुच्छ ठेवला अन्...

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेत सुरक्षेचा मोठा भंग झाल्याचे वृत्त आहे. एका वाहनाने बॅरियर तोडून गेट क्रमांक २ मधून

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

Crime News : पाटण्यात माणुसकीला काळीमा; सख्ख्या काकाकडूनच ३ वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार

पाटणा : बिहारची राजधानी पाटणामध्ये नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परसा बाजार

Ladakh: लिलावात २५ हजार रुपयांना विकले गेले १० रुपये किमतीचे अंडे; इराणी पीडितांसाठीचा अनोखा उपक्रम चर्चेत

नवी दिल्ली: लडाखमधील लेह जिल्ह्यातील लोक इराणच्या लोकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. युद्धाच्या काळात

Delhi: पार्किंगवरून महिला उपनिरीक्षक आणि वृद्ध व्यक्तीमध्ये वाद, पोलिसांनी काय कारवाई केली?

दिल्ली: दिल्लीतील उत्तर रोहिणी परिसरात पोलीस आणि नागरिकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. मिळालेल्या