Tuesday, March 17, 2026

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी भारतात झालं आहे. या टँकरमध्ये ४६ हजार ५०० मेट्रिक टनांहून अधिक द्रवित पेट्रोलियम वायू म्हणजेच एलपीजी आहे. अँकरेजवर याची शिप-टू-शिप ट्रान्सफर प्रक्रिया केली जाणार आहे.

दीनदयाल पोर्ट प्राधिकरण (डीपीए) चे अध्यक्ष सुशील कुमार सिंह यांनी ‘एमटी नंदा देवी’ या मदर व्हेसलच्या कॅप्टन आणि क्रूशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी जहाजाला भेट दिली. हे जहाज युद्धग्रस्त होर्मुज सामुद्रधुनी पार करून वाडिनार बंदर, गुजरात येथे पोहोचले. मध्य-पूर्वेतील वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर होर्मुज सामुद्रधुनीतून प्रवास करणारे हे भारताचे दुसरे जहाज ठरले आहे.

यापूर्वी एक दिवस आधी ‘शिवालिक’ हा एलपीजी टँकर मुंद्रा बंदर, गुजरात येथे ४६ हजार मेट्रिक टनांहून अधिक एलपीजी घेऊन पोहोचला होता. या टँकरमधील गॅस भारतातील घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलो वजनाच्या सुमारे ३२.४ लाख मानक घरगुती सिलेंडर इतका होता.

Comments
Add Comment