रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा


मुंबई : राज्यातील रब्बी हंगाम २०२५-२६ मधील 'ई-पीक पाहणी' करण्याची मुदत आता ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात येत असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी विधानसभेत केली.


बावनकुळे म्हणाले की, "२५ जानेवारी २०२६ पासून सहाय्यक स्तरावर ई-पीक पाहणीची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत रब्बी हंगामातील पिकांची केवळ ५५.६९ टक्के नोंदणी पूर्ण झाली आहे. सुमारे ४५ टक्के शेतकरी या नोंदणी प्रक्रियेपासून लांब आहेत. ही नोंदणी १०० टक्के पूर्ण व्हावी, या हेतूने सरकारने मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.पीक विम्यासह सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ई-पीक पाहणी अत्यंत महत्त्वाची आहे.”


जमाबंदी आयुक्त आणि कृषी आयुक्त यांनी समन्वयाने काम करून 'ॲग्री स्टॅक' मधील डेटाची नोंदणी तातडीने पूर्ण करावी," अशी सूचना प्रशासनाला केली असल्याचे सांगून बावनकुळे म्हणाले की, पीक पाहणीची पडताळणी अचूक आणि वेळेत व्हावी, यासाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे.

Comments
Add Comment

Spirituality to your everyday life : अध्यात्म म्हणजे जगापासून पळणे नव्हे, तर शांततेने जगणे; गौर गोपाल दास यांनी सांगितले दैनंदिन जीवनात अध्यात्म आणण्याचे ५ सोपे मार्ग

मुंबई : आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात 'अध्यात्म' हा शब्द ऐकला की, अनेकांना वाटते की यासाठी घरदार सोडून

LED fishing boats will be cancelled : एलईडी मासेमारी बोटींना डिझेल पुरवठा करणाऱ्या मच्छिमार संस्थांची नोंदणी रद्द करणार

मंत्री नितेश राणे यांचा इशारा; पारंपरिक मच्छिमारांना त्रास देणाऱ्यांची खैर नाही मुंबई :

Minister Adv. Ashish Shelar : कोकणातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास मान्यता - मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई : कोकणातील रत्नागिरी विभागातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास प्रशासकीय

Revenue Minister Chandrashekhar Bawankule : उत्खनन रॉयल्टी, बिनशेती प्रक्रिया होणार डिजिटल

राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी मोठा दिलासा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी क्रेडाईचे सर्व प्रश्न लावले

Revenue Minister Bawankule : अनेकदा व्हरांड्यात झोपलो पण हार मानली नाही..! महसूलमंत्री बावनकुळे आमदार निवासातील आठवणींत रमले

सुरक्षा रक्षक ते स्वीपर... सर्वांची आस्थेने विचारपूस मुंबई : राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात महसूलमंत्री

Pune News : थेट जमिनीवर आपटल्या अन्...; वॉटरपार्कमधील कमी पाणी महिलेच्या जीवावर बेतले, आयुष्यभराचे अपंगत्व

पुणे : वाढत्या उन्हाळ्यामुळे थंड पाण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले वॉटरपार्ककडे वळत असतानाच, शिरूर