मुंबई : कोकणातील आंबा व काजू पिकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आज विधान भवन, मुंबई येथे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोकणातील मंत्री व लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आंबा व काजू पिकांचे प्रत्यक्ष झालेले नुकसान, हवामानातील बदल आणि शेतकऱ्यांची अडचण यावर सविस्तर चर्चा झाली.
कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशन संपण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस नुकसानभरपाई जाहीर करणार ! कोकणातील आंबा व काजू पिकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आज विधान भवन, मुंबई येथे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोकणातील मंत्री व… pic.twitter.com/mhDRas8fEv
— Nitesh Rane (@NiteshNRane) March 17, 2026
आंबा व काजू पिकांचे तब्बल ९० टक्के नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे सादर झाला असून, कोकणातील शेतकरी मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर परिस्थितीचा लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडून सखोल आढावा घेत, अधिवेशन संपण्यापूर्वीच शेतकऱ्यांना दिलासा देणारी मदत जाहीर केली जाईल असे आश्वासन दिले.
या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, कृषी मंत्री दत्ता भरणे , उद्योग मंत्री उदय सामंत , महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले , गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार निलेश राणे, आ. दीपक केसरकर, आ. प्रवीण दरेकर, आ. प्रसाद लाड, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. भास्कर जाधव, आ. महेंद्र दळवी, आ. राजेंद्र गावित, आ. किरण सामंत आदी उपस्थित होते.






