दुबई विमानतळावर इराणचा हवाई हल्ला, सर्व उड्डाणं रद्द

दुबई : पश्चिम आशियात २८ फेब्रुवारी २०२६ पासून अमेरिका - इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या युद्धाने आता १७ व्या दिवसांत प्रवेश केला आहे. इराणने सोमवारी १६ मार्च २०२६ रोजी सकाळीच दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यामुळे विमानतळावर एका इंधन टाकीला आग लागली. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व नियोजीत उड्डाणं पुढील सूचनेपर्यंत स्थगित केली आहेत अथवा अन्यत्र वळवली आहेत. विमानतळावर दहशतीचे वातावरण आहे. परिस्थिती थोड्याच वेळात नियंत्रणात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पण प्रवाशांना त्यांच्या विमानाचे नियोजन जाणून घेण्यासाठी थेट आपापल्या विमान कंपनीच्या संपर्कात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.







हवाई हल्ल्यात जीवितहानी झालेली नाही पण दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका इंधन टाकीला आग लागली आहे. ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न अग्निशमन दल करत आहे. अग्निशमन दलाकडून जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोपर्यंत विमान वाहतूक बंदच राहील, असे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रशासनाने सांगितले.





युद्धाला दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. पण अमेरिकेच्या अपेक्षेप्रमाणे इराण शरण आलेला नाही. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सातत्याने इराणला मोठे दणके दिल्याचे सांगत आहेत. तर इराण अधूनमधून आखाती देशांतील पंचतारांकीत हॉटेल, बहुराष्ट्रीय बँकांची कार्यालये, आंतरराष्ट्रीय विमानतळ, अमेरिकेचे आखाती देशांतील तळ, अमेरिकेचे रडार स्टेशन आदी ठिकाणी हल्ले केल्याचे सांगत आहे. इराणची लढण्याची बरीचशी ताकद नष्ट केल्याचे ट्रम्प सांगत आहेत. पण अमेरिकेची अवघ्या १६ दिवसांत दोन लढाऊ विमानं आणि सहा हवेत इंधन भरणारी केसी १३५ स्ट्रॅटोटँकर अशी एकूण आठ विमानं पाडल्याचे इराण सांगत आहे. इराण विरुद्ध आपलीच सरशी होत असल्याचे सांगणाऱ्या अमेरिकेने हळू हळू युद्धात मारल्या गेलेल्या स्वतःच्या सैनिकांची नावं जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.


युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत यूएईला लक्ष्य करून इराणने १८०० पेक्षा जास्त हवाई हल्ले केले आहेत. यात क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे केलेल्या अनेक हल्ल्यांचा समावेश आहे. इराणच्या हल्ल्यांमुळे यूएईमध्ये जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे.

Comments
Add Comment

PM Modi SCO Summit : बिश्केकमध्ये पंतप्रधान मोदींची पुतीन, पेझेश्कियन यांच्याशी भेट; वर्ल्ड नोमॅड गेम्सच्या उद्घाटन सोहळ्यालाही उपस्थिती

बिश्केक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या किर्गिस्तानच्या दौऱ्यावर असून, बिश्केक येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन

US Iran Conflict : अमेरिकेच्या हल्ल्याला इराणचा पलटवार; जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला, होर्मुजमध्ये तणाव वाढला

तेहरान : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. अमेरिकेने इराणच्या लारक बेटावरील दोन रॉकेट

North Cyprus Ferry Accident : मोठी बातमी! २७० प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी बोट उलटली; १०० हून अधिक जणांची सुटका, बचावकार्य सुरू

उत्तर सायप्रस : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. २७० प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी

Switzerland Rave Shooting : स्वित्झर्लंडमध्ये रेव्ह पार्टीत अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू, पाच गंभीर जखमी

बर्न : स्वित्झर्लंडमधील आराऊ शहरात रविवारी पहाटे रेव्ह पार्टीदरम्यान झालेल्या अंदाधुंद गोळीबारात एका

Quetta Gurdwara Demolition : बलुचिस्तानात ऐतिहासिक गुरुद्वारा पाडला, शीख समाजात संताप; भारतातूनही तीव्र विरोध

क्वेटा : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथे असलेले सुमारे २०० वर्षे जुने ऐतिहासिक श्री

PM Narendra Modi Uzbekistan Visit : भारत-उझबेकिस्तान संबंधांना व्यापक धोरणात्मक भागीदारीचा दर्जा देण्याची घोषणा

ताश्कंद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शौकत मिर्ज़ियोयेव यांच्यासोबत