Monday, March 16, 2026

बाल मराठी संमेलनाचा उत्साह शिगेला; नवी मुंबईतील रॅलीत शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग नीलम सामंत यांचा खास सहभाग

बाल मराठी संमेलनाचा उत्साह शिगेला; नवी मुंबईतील रॅलीत शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग नीलम सामंत यांचा खास सहभाग

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बाल मराठी संमेलनाचा उत्साह सध्या शिगेला पोहोचला आहे. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने आज नवी मुंबईत भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

नवी मुंबईतील वाशी येथील प्रदर्शन केंद्रात आज आणि उद्या अशा दोन दिवसांच्या बाल मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.

या रॅलीमध्ये मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम सामंत यांचा विशेष सहभाग होता. शेकडो विद्यार्थी, शिक्षक आणि मराठीप्रेमींनी या रॅलीत सहभागी होत मराठी भाषेबद्दलचा अभिमान व्यक्त केला.

यावेळी बोलताना नीलम सामंत यांनी नवी मुंबईकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार मानले. तसेच मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार जगभर व्हावा यासाठी राज्य सरकार आणि मराठी भाषा विभागाच्या वतीने सातत्याने विविध उपक्रम राबवले जातील, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमधील हा उत्साह पाहून आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment