अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण संघर्ष; खामेनीच्या ठिकाणाबाबत संभ्रम, खामेनी रशियात ?

मॉस्को/तेहरान : इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांना गुप्तपणे रशियात हलवण्यात आल्याचा दावा कुवेतमधील एका वृत्तपत्राने केला आहे. या वृत्तामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.


संघर्ष सुरू झाल्यानंतर इराणचे माजी सर्वोच्च नेते अय्यातुला खामेनी यांच्या मृत्यूनंतर देशात मोठी राजकीय हालचाल झाली होती. त्यानंतर मोजतबा खामेनी यांची सर्वोच्च नेतेपदी निवड करण्यात आली. मात्र या काळात त्यांच्याही सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात होती.


कुवेतच्या अल जरीदा या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मोजतबा खामेनी यांना अत्यंत गुप्त पद्धतीने रशियन लष्करी विमानातून मॉस्कोला नेण्यात आले. इराणमधील वाढत्या हल्ल्यांमुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यांना मॉस्कोतील क्रेमलिन परिसरातील विशेष वैद्यकीय सुविधेत दाखल करण्यात आल्याचा दावा देखील या वृत्तात करण्यात आला आहे.


दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत मोजतबा खामनेई यांच्या स्थितीबाबत अनिश्चितता व्यक्त केली. ते जिवंत आहेत की नाही, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे या प्रकरणाभोवती आणखी चर्चा सुरू झाली आहे.


इराणच्या सूत्रांनी मात्र मोजतबा खामेनी सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. तरीही त्यांना रशियात हलवण्यात आल्याच्या वृत्तामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जर हे वृत्त खरे ठरले, तर रशियाची भूमिका या संघर्षात अधिक महत्त्वाची ठरू शकते आणि इराण-अमेरिका-इस्रायल तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू जीवंत आहेत की... ?

तेल अविव : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूचे वृत्त व्हायरल होत आहे. पण इस्रायल सरकारच्या

Donald Trump : राष्ट्राध्यक्ष ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; चीन, जपान, ब्रिटनकडे अमेरिकेची मदतीची हाक

- होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित करण्यासाठी अमेरिकेचे अनेक देशांना आवाहन अमेरिका–इस्रायल–इराण संघर्षाचा आज

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्पची सारवासारव; इराणला युद्ध थांबवायचे आहे पण...

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. अशातच शनिवारी (१४ मार्च)

Israel - Lebanon : पश्चिम आशियात नवा ट्विस्ट; इस्रायलसोबत चर्चेसाठी लेबनॉन सज्ज, पण...

लेबनॉनने संकेत दिले आहेत की ते इस्रायलसोबत थेट शांतता चर्चेसाठी तयार आहे. मात्र त्यासाठी आधी युद्धविराम लागणे

Indian Navy in Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीत तणावाचा स्फोट? भारतीय जहाजांच्या सुरक्षेसाठी नौदल अलर्ट मोडवर

पश्चिम आशियात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने फारसच्या आखाताजवळ आपल्या अनेक युद्धनौका तैनात

Meta आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी २० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार ?

- एआय तंत्रज्ञानातील वाढत्या स्पर्धेमुळे कर्मचारी संरचनेत बदल मेटा प्लॅटफॉर्म ही फेसबुक आणि इंस्टाग्राम या