भारतात चॅट जीपीटीपेक्षा लोकप्रिय झाले इंडियन ऑइल कंपनीचे अ‍ॅप

नवी दिल्ली : गूगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर या दोन प्लॅटफॉर्मवर सध्या चॅट जीपीटीपेक्षा इंडियन ऑइल कंपनीचे अ‍ॅप जास्त लोकप्रिय आहे.


पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराण विरोधात युद्ध पुकारले आहे. या युद्धाने आता १६ व्या दिवसांत प्रवेश केला आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर देशात अनेक ठिकाणी एलपीजी सिलेंडरच्या टंचाईची अफवा पसरली होती. नवा एलपीजी सिलेंडर बुक करण्याची प्रक्रिया इंडियन ऑइल कंपनीच्या अ‍ॅपद्वारे करता येईल हे कळल्यानंतर अनेकांनी गूगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर या दोन्ही प्लॅटफॉर्मवर इंडियन ऑइल कंपनीचे अ‍ॅप सर्च करण्याला आणि ते डाऊनलोड करुन घ्यायला प्राधान्य दिले. यामुळे भारतात गूगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर या दोन्ही प्लॅटफॉर्मवर चॅट जीपीटीपेक्षा इंडियन ऑइल कंपनीच्या अ‍ॅपचे महत्त्व वाढले आहे. याच कारणामुळे सध्या इंडियन ऑइल कंपनीचे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर चॅट जीपीटीला मागे टाकण्यात तसेच लोकप्रिय अ‍ॅप या श्रेणीत अव्वलस्थान पटकावण्यात यशस्वी झाले आहे. आता तर कमी कालावधीत सर्वाधिक डाऊनलोड झालेल्या अ‍ॅपच्या श्रेणीतही इंडियन ऑइल कंपनीचे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर अव्वलस्थानी आहे.


भारतात सिलेंडर बुक करण्याचे वेगवेगळे अधिकृत अ‍ॅप आहेत. पण सध्या या अ‍ॅपमध्ये इंडियन ऑइल कंपनीचे अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय आहे. या अ‍ॅपच्या सर्च आणि डाऊनलोडमध्ये मागील काही दिवसांत लक्षणीय वाढ झाली आहे. डाऊनलोडच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. यामुळे इंडियन ऑइल कंपनीच्या अ‍ॅपची लोकप्रिय चढत्या क्रमाने वाढत आहे.


भारतात एलपीजी सिलेंडर बुक करण्यासाठी प्रत्येक प्रमुख गॅस कंपनीचे स्वतंत्र अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशन उपलब्ध आहे. या अधिकृत ॲपची यादी : IndianOil ONE, Hello BPCL, HP Pay, UMANG


WhatsApp/Missed Call : इंडेन - ७७१८९५५५५५, भारत गॅस - १८००२२४३४४, एचपी गॅस Missed Call - ९४९३६ ०२२२२, एचपी गॅस WhatsApp - ९२२२२ ०११२२

Comments
Add Comment

Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा

Delhi: हातात पुष्पगुच्छ घेऊन थेट शिरला विधानसभेत, अध्यक्षांच्या गाडीजवळ फुलांचा गुच्छ ठेवला अन्...

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेत सुरक्षेचा मोठा भंग झाल्याचे वृत्त आहे. एका वाहनाने बॅरियर तोडून गेट क्रमांक २ मधून

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

Crime News : पाटण्यात माणुसकीला काळीमा; सख्ख्या काकाकडूनच ३ वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार

पाटणा : बिहारची राजधानी पाटणामध्ये नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परसा बाजार

Ladakh: लिलावात २५ हजार रुपयांना विकले गेले १० रुपये किमतीचे अंडे; इराणी पीडितांसाठीचा अनोखा उपक्रम चर्चेत

नवी दिल्ली: लडाखमधील लेह जिल्ह्यातील लोक इराणच्या लोकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. युद्धाच्या काळात

Delhi: पार्किंगवरून महिला उपनिरीक्षक आणि वृद्ध व्यक्तीमध्ये वाद, पोलिसांनी काय कारवाई केली?

दिल्ली: दिल्लीतील उत्तर रोहिणी परिसरात पोलीस आणि नागरिकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. मिळालेल्या