सिनेमागृहात आपली दमदार छाप पाडल्यानंतर आता लवकरच बॉर्डर 2 हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. १९९७ मध्ये आलेला बॉर्डर चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. तसेच, बॉर्डर २ या चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, ज्यांना बॉर्डर २ हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहता आला नाही. त्यांना आता घरबसल्या बॉर्डर २ पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.
सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर 2 महिन्यातच आता हा चित्रपट डिजीटल प्लॅटफॉर्मवर पाहता येणार असून येत्या २० मार्च २०२६ रोजी बॉर्डर २ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ज्यांना हा चित्रपट सिनेमागृहात पाहता आला नाही. त्यांना आता हा चित्रपट लवकरच घरबसल्या पाहायला मिळणार आहे.
बॉर्डर २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरातून ४४९.६५ कोटी रुपयांची कमाई केली असून भारतातून या चित्रपटाने एकूण ३२८.९६ कोटीची कमाई केली आहे.






